...अन् मुख्यमंत्र्यांना भावला नवेगावबांधचा चहा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:18 PM2019-08-04T19:18:45+5:302019-08-04T19:21:12+5:30

बिलही दिले स्वत: उपस्थितांनी अनुभवला साधेपणा

Chief Minister feel emotional for navegaobandh's tea | ...अन् मुख्यमंत्र्यांना भावला नवेगावबांधचा चहा 

...अन् मुख्यमंत्र्यांना भावला नवेगावबांधचा चहा 

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी त्यांना पैसे घेण्याचा आग्रह केल्यानंतर हॉटेल मालकांनी बिल घेतले.सामान्य कार्यकर्त्यांशी सुध्दा ते तेवढ्याच नम्रपणे वागतात.

नवेगावबांध - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. सामान्य कार्यकर्त्यांशी सुध्दा ते तेवढ्याच नम्रपणे वागतात. याचा प्रत्यय व अनुभव अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील गावकरी आणि हॉटेल मालकाला रविवारी आला. मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा चक्क पंधरा मिनिटे थांबवून त्यांच्या हॉटेलात चहाचा आस्वाद घेतला. तसेच चहाचे बिल सुध्दा स्वत:च दिले. मुख्यमंत्र्याच्या या स्वभावाने हॉटेल मालक व उपस्थित देखील काही क्षण अवाक झाले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर ही यात्रा रविवारी सकाळी गोंदियाहून अर्जुनी मोरगावकडे रवाना झाली.द रम्यान गोंदिया-अर्जुनी मोरगाव मार्गावरील नवेगावबांध येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास ही यात्रा पोहचली.या दरम्यान मुख्यमंत्र्यांना चहाची तलप आली.त्यांनी लगेच आपले वाहन थांबवून नवेगाबबांध येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या अंत्यंत साध्या हॉटेल जावून स्वत:च सर्वांसाठी चहाची आर्डर दिली. खुद्द मुख्यमंत्री आपल्या हॉटेलात आल्याची कल्पनाच हॉटेलचे मालक रविंद्र मोहबंशी होत नव्हती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बसयला खुर्ची दिली.मुख्यमंत्र्यांनी सुध्दा हॉटेलच्या बाहेर मोकळ्या वातावरणात सर्वांसह बसणे पसंत केले.त्यानंतर चहाचा आस्वाद घेत तब्बल पंधरा ते वीस मिनिटे हॉटेलमधील ग्राहक आणि गावकºयांशी गप्पा केल्या.तसेच तुमच्या काही समस्या व अडचणी आहेत का अशी आस्थेने त्यांना विचारपूस सुध्दा केली.यावेळी उपस्थित काही गावकरी हॉटेलचे मालक रविंद्र मोहबंशी यांनी कोहमारा-अर्जुनी मोरगाव या राज्य मार्गाची फारच दुरवस्था झाली असून ये-जा करणे कठीण झाले असून अपघातांची संख्या वाढली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ही समस्या लवकर मार्गी लागेल असे आश्वासन दिले.त्यानंतर चहाचा आस्वाद घेतला व स्वत:च काऊंटरवर जाऊन चहाचे बिल हॉटेल मालकाला दिले. त्यांनी बिल घेण्यास नकार दिला मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना पैसे घेण्याचा आग्रह केल्यानंतर हॉटेल मालकांनी बिल घेतले. दरम्यान वीस मिनीटांच्या संवादात गावकरी आणि हॉटेल मालकाने मुख्यमंत्र्यामधील साध्या माणसाचे दर्शन घडले.  

निव्वळ योगायोग 
हॉटेल मालक रविंद्र मोहबंशी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना सांगितले की आज माझ्या आईची पुण्यतिथी होती.आईच्या छायाचित्राला अभिवादन करुन आलो. अन चक्क आपल्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री आल्याचा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. 

नागपूरला येण्याचे दिले निमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालक रविंद्र मोहबंशी यांच्याशी पाच ते सात मिनिटे संवाद साधला. तसेच तुम्हाला काही समस्या व अडचण आल्यास केव्हाही मला फोन करा, मुंबईला येण्याची गरज नसून तुम्ही नागपूरला घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले

Web Title: Chief Minister feel emotional for navegaobandh's tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.