मुख्यमंत्र्यांचा कचारगड दौरा ठरणार ऐतिहासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:17 AM2019-02-17T00:17:00+5:302019-02-17T00:17:40+5:30

रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील.

Chief Minister's Kachargad tour to be held | मुख्यमंत्र्यांचा कचारगड दौरा ठरणार ऐतिहासिक

मुख्यमंत्र्यांचा कचारगड दौरा ठरणार ऐतिहासिक

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी हेलिकॉप्टरने आगमन : पुराम यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. कचारगड यात्रेच्या मागील ३२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसारखा व्यक्ती येत असून या वर्षाची कचारगड यात्रा आणि मुख्यमंत्र्याचा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे. विशेष म्हणज,े मुख्यमंत्र्यासोबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सुध्दा कचारगडला भेट देण्यासाठी येत असून या आयोजनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या देशाचे मूळ निवासी असलेले आदिवासी यांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखला जाणारा कचारगड आदिवासीचे उगम स्थळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजासाठी कचारगड हे स्थळ महत्वाचे असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी आपल्या पूर्वजांची आठवण करण्यासाठी त्यांची नैसर्गिक पूजा करण्यासाठी देशभरातील आदिवासी समाज लाखोच्या संख्येने येते.
विविध दृष्टीकोनातून या स्थळाला मोठा महत्व असून सुध्दा शासन स्तरावर याची फारसी दखल घेतली गेली जात नव्हती. परंतु ‘लोकमत’ने या स्थळाला सतत पाठपुरावा करीत याचे महत्व वाढविणारे लेख व बातम्या प्रकाशित करण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले. एवढेच नाही तर येथे भाविकांना होणाºया त्रासाबद्दल व तोकड्या सोयी सुविधा बद्दल सुध्दा शासन-प्रशासनाचे ध्यानाकर्षण करण्याचे काम केले.
कचारगड यात्रेत दरम्यानच नाही तर वर्षभर कचारगडचा महत्व कायम राहावे यासाठी शासन-प्रशासन स्तरावर सतत दखल घेतली जावी म्हणून आ. पुराम मागील पाच वर्षापासून सतत प्रयत्नशील राहीले. दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते आणि महाराष्ट्राचे अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार कचारगड यात्रेत भेट देऊन गेले. पालकमंत्री राजकुमार बडोले सुध्दा अनेक वेळा भेट देऊन गेले. मुनगंटीवार यांनी या स्थळाला पाच कोटीचा निधी सुध्दा मंजूर केला. परंतु या स्थळाच्या महत्वाला लक्षात घेता तेवढे सहकार्य शासन स्तरावर करण्यात आले नाही म्हणून अनेक बाबतीत कचारगड विकासापासून दूरच राहीला या बाबीचा विचार करीत आ.पुराम यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या स्थळाबद्दल सविस्तर सांगीतले व त्यांना कचारगडला येण्यास प्रेरीत केले. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री येथे आल्यावर कचारगडला काय देवून जाणार हे बघावे लागेल.

प्रथमच हेलीकॉप्टर लँॅडींग
धनेगाव दरेकसा परिसर अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात असून या भागात मंत्री व नेत्यांचे दौरे फार कमी होतात. मात्र महाराष्ट्र निर्मीतीनंतर मागील ६७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या राज्याचा मुख्यमंत्री सालेकसा तालुक्यात उतरणार आहे. ते ही सरळ यात्रेच्या ठिकाणाजवळ त्यांचे हेलीकॉप्टर लॅडींग करणार आहे. दरेकसा येथील शसस्त्र दूर क्षेत्राच्या परिसरात हॅलीपॅड बनविले जात असून चारही बाजूंनी डोंगराळ भागाने वेढलेल्या या ठिकाणात कडेकोट बंदोबस्त लावण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि खासदार, आमदार यांच्या आगमनाने निश्चितच कचारगड यात्रा यावर्षी ऐतिहासीक ठरणार आहे.

Web Title: Chief Minister's Kachargad tour to be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.