भीषण! झोपमोड केली म्हणून मुलाने केली आईची हत्या; गोंदिया जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:50 PM2020-04-28T19:50:09+5:302020-04-28T19:50:42+5:30

सकाळी झोपमोड केली म्हणून संतप्त झालेल्या एका मुलाने आपल्या आईवर कुºहाडीचे घाव घालून तिला ठार केल्याची अमानवी घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ब्राह्मणी गावात मंगळवारी सकाळी घडली.

The child killed the mother ; Gondia district | भीषण! झोपमोड केली म्हणून मुलाने केली आईची हत्या; गोंदिया जिल्हा

भीषण! झोपमोड केली म्हणून मुलाने केली आईची हत्या; गोंदिया जिल्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: सकाळी झोपमोड केली म्हणून संतप्त झालेल्या एका मुलाने आपल्या आईवर कुºहाडीचे घाव घालून तिला ठार केल्याची अमानवी घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ब्राह्मणी गावात मंगळवारी सकाळी घडली.
आमगाव देवरी रोडवरील बाम्हणी गावातील प्रमोद मनीराम शेंडे वय ३८ वर्षे हा नेहमी गोठयात पलंगावर झोपत असे. आज सकाळी २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता प्रमोदची आई मिनाबाई शेंडे ( ५५) नेहमीप्रमाणे गोठा साफ करण्यासाठी आली व झोपलेल्या प्रमोदला हाक देऊन उठवू लागली. मला दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडीत असते असे म्हणून बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून रागाच्या भरात त्याने आईवर दांड्याने वार केला. या वाराने मीनाबाई रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
ही बातमी गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर महिलेच्या पती मनीराम शेंडे वय ५८ वर्षे यांच्या तक्रारीवरून जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलाविरुद्ध भा द वी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम काळे व त्यांची चमू करीत आहेत.

Web Title: The child killed the mother ; Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून