बालमृत्यूदर १८.८ टक्के
By admin | Published: May 20, 2017 01:59 AM2017-05-20T01:59:16+5:302017-05-20T01:59:16+5:30
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात मृत्यू झालेल्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. फक्त एकच बालक सुदृढ होता.
‘त्या’ बालकांचा कुपोषणाने मृत्यू : पत्रपरिषदेत डॉ. दोडके यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात मृत्यू झालेल्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. फक्त एकच बालक सुदृढ होता. गोंदियाचा बालमृत्यूदर १८.०८ टक्के आहे. हा मृत्यूदर राज्याच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. या बालमृत्यूदराला कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. रूग्णालयात ६५ टक्के प्रसूती सामान्य तर ३५ टक्के प्रसूती शस्त्रक्रिेयद्वारे होत असल्याची माहिती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके यांनी दिली.
गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दलाल सक्रिय आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी रूग्णालयात कमीत कमी १६ सुरक्षा रक्षकाची गरज आहे. गंगाबाईत मृत पावलेल्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित होते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात १ एप्रिल ते १४ मे दरम्यान १६५ बालकांना दाखल करण्यात आले. यात एप्रिल महिन्यात १२ तर मे महिन्याच्या १४ तारखेपर्यंत ६ बालकांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या बालकांपैकी फक्त एकच बाळ सुदृढ होता. उर्वरीत सर्व बाळ कुपोषित होते. केटीएस मधील सिटीस्कॅन मशीन संदर्भात अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मशीनची तपासणी केल्याचे सांगितीतले. काही उपकरणे आणले आहेत.
येत्या ८ ते १० दिवसात सीटीस्कॅन मशीन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.दोडके यांनी सांगितले की, रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी ३ रूग्णवाहीका आहेत. रक्तसंक्रमणपेढी करीता एक रूग्णवाहीका वेगळी आहे.डॉक्टराच्या कमरतरतेमुळे सोनोग्राफी काही दिवसापासून बंद आहे. पुणे व अमेरिका येथील स्वयंसेवी संस्थांनी या स्त्री रूग्णालयाला काही उपकरणे दिले आहेत. त्यामुळे बालमृत्यूवर आळा बसेल. गंगाबाईतून निघणाऱ्या कचऱ्याचेी व्यवस्थापन होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य राहात असल्याचे सांगण्यात आले.
रिक्त पदांकडेही लक्ष वेधतांना ५० टक्के गंगाबाई स्त्री रूग्णालयातील पदे रिक्त आहेत. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होतो. प्रथम श्रेणीचे ५ पैकी दोन पदे भरलेली आहेत. द्वितीय श्रेणीच्या १८ पदापैकी १३ पदे भरलेली आहेत.
स्टापनर्सच्या ६० पैकी ३० पदे भरलेली आहेत. चतुर्थ श्रेणीच्या ५३ पैकी फक्त १८ पदे भरलेली आहेत.या रूग्णालयात ११० बेडची व्यवस्था आहे. यात ७०-८० बेड शस्त्रक्रिया ककरणाऱ्या रूग्णांसाठी आहेत. नविन रूग्णांसाठी फक्त ३० बेड आहेत. त्यामुळे सर्व रूग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाही.