झेडपीचे ‘जिव्हाळ्यातून’ बालसंरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:28 AM2017-12-10T00:28:39+5:302017-12-10T00:29:24+5:30

बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर भीतीपोटी बालके याची माहिती पालकांना देत नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्यातील भिती दूर करुन अशा घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने ‘जिव्हाळा’ उपक्रम हाती घेतला आहे.

Child protection from ZP's 'Jivadar' | झेडपीचे ‘जिव्हाळ्यातून’ बालसंरक्षण

झेडपीचे ‘जिव्हाळ्यातून’ बालसंरक्षण

Next
ठळक मुद्देभयमुक्त वातावरणासाठी : जिल्ह्यातील १०६९ शाळांत वाटणार घडीपत्रिका

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर भीतीपोटी बालके याची माहिती पालकांना देत नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्यातील भिती दूर करुन अशा घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने ‘जिव्हाळा’ उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील १०६९ शाळांत बाल संरक्षणासाठी ‘जिव्हाळा’ या बाल संरक्षण घडीपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे तसेच विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणाचे प्रकार घडू नये, यासाठी सीईओ ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संरक्षण आणि जनजागृतीसाठी काय करायला हवे, काय करू नये, त्यासाठी असणारे कायदे यावर सविस्तर माहिती असलेले जिव्हाळा हे पत्रक प्रत्येक शाळेत पाठविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुुख व गटशिक्षणाधिकारी यांनी बाल संरक्षण धोरणाची अमंलबजावणी कशी करावी, या संदर्भात सूचना या घडी पत्रकेत देण्यात आली आहेत. कोणतेही विद्यार्थी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शारिरीक वा मानसिक शोषणाला बळी पडू नयेत, यासाठी शिक्षकांनी तत्पर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांमध्ये भयमुक्त वातावरण, निरामय आनंदी वातावरण, मुलांचे मनोधैर्य वाढविणे, बालसंरक्षीत वातावरण तयार करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बाल संरक्षणासाठी असे दिले निर्देश
बालकांचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती प्रशिक्षण व माहिती देणे, बाल हक्क आधारीत दृष्टीकोण तयार करणे, प्रतिबंधात्मक आणि सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून उपाय करणे, शाळेच्या आवारात मुख्य ठिकाणी संवाद पेटी बसविली जाणार आहे. शाळेच्या आवारात शाळा प्रमुखांचे संवाद वर्ग, शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी यांचे समुपदेशन मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत देणे, संदेशात्मक फलक, शाळेची परवनागी घेतल्याशिवाय स्वयंसेवी संघटनांनी शाळेत कार्यक्रम करू नये, शाळेत भेट देणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्राची सक्ती करावी, शाळेला भेट देणाºयांसाठी नोंदवही असावी. शाळेच्या आवारात सिसिटीव्ही कॅमेरे लावावे, शाळेला सुट्टी असेल त्यावेळी शाळा दुरूस्तीचे काम करावे अश्या सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक शाळेत सुरक्षा मंच
काही शाळांमध्ये मुलांवर अत्याचार होत असल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मुलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. मुलांच्या समस्येबाबत विविध समस्या शोधून काढणे, शाळा सुरक्षितता व सुरक्षा मंच स्थापन करण्यात येणार आहे. सुरक्षीत शाळा आराखडा तयार करावा लागणार आहे.

Web Title: Child protection from ZP's 'Jivadar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.