सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:30 AM2017-12-04T00:30:06+5:302017-12-04T00:31:06+5:30

नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे.

Children's safety atmosphere due to security races | सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण

सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : समारोप व पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. या दौडमुळे जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना प्रगतीची संधी देखील उपलब्ध करु न देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया पोलीस दलाच्या वतीने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमध्ये कॅरियर घडविण्यासाठी आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचा समारोप व पुरस्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे संचालक राहूल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. अग्रवाल यांनी, गावाच्या विकासासाठी आणि आदिवासींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस व प्रशासन काम करीत आहे. नक्षलग्रस्त आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना धावण्याच्या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळावे यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण भविष्यात मिळणार असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे यांनी, आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुलांचे पोलिसांबाबतचे अंतर या दौडमुळे कमी होण्यास मदत झाली आहे. पोलिसांचा संबंध हा गुन्हेगारीला आळा घालणे याबाबत येतो. मात्र या कार्यक्र माच्या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक बांधीलकी जोपासल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. पाटील म्हणाले की, पोलिसांसाठी सोशल पोलिसींग ही अवघड बाब असताना जिल्ह्यात सोशल पोलिसींगच्या माध्यमातून नक्षलग्रस्त व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा दौडचे आयोजन करून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी चांगला पायंडा घातला असून त्यात ते यशस्वी झाले आहे.
प्रास्ताविकातून डॉ.भूजबळ यांनी, जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्र म राबविण्यात येत आहे. याचा उद्देश नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा व आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे हा असल्याचे मत मांडले.
आदिवासी विद्यार्थ्यांची जडणघडण चांगली व्हावी, त्यांच्या कॅरियरला दिशा देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या यशस्वी आयोजनातून पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. संचालन व आभार मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस अधिकाºयांसह स्पर्धेत सहभागी आश्रमशाळा, शाळा व वसतिगृहाचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, अधीक्षक, पालक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचार्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालयातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Children's safety atmosphere due to security races

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.