वरातीत मुलाच्या मद्यपी मामाने घुसवली कार; मुलीचे काका ठार, ३ गंभीर
By नरेश रहिले | Published: December 16, 2023 06:44 PM2023-12-16T18:44:41+5:302023-12-16T18:45:57+5:30
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगी येथील एका लॉन मध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी लग्न समारंभ असल्याने लग्नात वऱ्हाडी जमले होते.
गोंदिया : लग्न सोहळ्याची धामधूम सुरू असतांना सगळीकडे लगबग सुरू होती. नवरदेवचाी वरात काही वेळातच लग्न मंडपी पोहचणार असल्याने सर्वांनी एकच गर्दी केली होती. परंतु या भर वरातीत मद्यप्राशन केलेल्या नवरदेवाच्या मामाने चक्क वरातीत भरधाव वेगात कार घातली. यात मुलीच्या मामाचा मृत्यू तर तीन वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना १५ डिसेंबरच्या सायंकाळी ७:३० वाजता घडली. आत विनोद छगनलाल लिल्हारे (३२) रा. कटंगटोला (नागरा) ता. गोंदिया यांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर असल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगी येथील एका लॉन मध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी लग्न समारंभ असल्याने लग्नात वऱ्हाडी जमले होते. वराकडीलु मंडळी नाचत-गाजत वरात लग्न मंडीप घेऊन येत असतांना अवघ्या काही अंतरावर वरात होती. याचवेळी दारू ढोसून आलेल्या एमपी ५० ०४२१-२३१५ च्या कार चालकाने आपली कार चक्क वरातीवरच चढविली. यात विनोद लिल्हारे आणि इतर तीन असे चौघे गंभीर जखमी झाले. विनोद लिल्हारे यांचा पाय तुटला. त्या चौघांना गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेले. मात्र तिथून विनोद यांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे नेताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. लग्नाच्या शहनाईचा सूर क्षणार्धात मातंम च्या सूरांत पसरला. शांततेने त्वरीत लग्न सोहळा आटोपून संगीताविना लग्नसोहळा पार पडला. या घटनेसंदर्भात कार चालक अरविंद दिलिप देशमुख (५२) रा. जि. प. शाळेसमोर गोरेगाव ह.मु. रोहीतनगर एक्सटर्नल कॉलेजजवळ भोपाल ता. जि. भोपाल (मध्यप्रदेश) याच्याविरूध्द रामनगर पोलिसांनी महेश बालीराम सिल्वारे (३६) रा. चांदणीटोला यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कार चालकाला बदडले
भर वरातीत वऱ्हाड्यांवर कार चढविणाऱ्या अरविंद दिलिप देशमुख (५२) रा. जि. प. शाळेसमोर गोरेगाव ह.मु. रोहीतनगर एक्सटर्नल कॉलेजजवळ भोपाल ता. जि. भोपाल (मध्यप्रदेश) याला वऱ्हाड्यांनी बेदम मारहाण केली. कारच्या काचा फोडल्या. कार चालकाला शिवगाळ करून लोकांनी मारहाण करीत काही काळ गोंधळ उडविला.