दारूबंदी सदस्यांच्या डोळ्यात टाकली मिरची पूड

By admin | Published: October 25, 2015 01:41 AM2015-10-25T01:41:40+5:302015-10-25T01:41:40+5:30

एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या दुकानात घुसून तिला मारहाण करण्याऱ्या दारूबंदी समितीच्या ...

Chilli Pudded in the eyes of the liquor party | दारूबंदी सदस्यांच्या डोळ्यात टाकली मिरची पूड

दारूबंदी सदस्यांच्या डोळ्यात टाकली मिरची पूड

Next

दोन गटातील वाद : ४७ जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया : एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या दुकानात घुसून तिला मारहाण करण्याऱ्या दारूबंदी समितीच्या सदस्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना मारहाण केल्याची घटना गुरूवारच्या सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. हे कृत्य दोघांनी केली.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथील कमला नोकलाल दमाहे (३५) यांच्या सोबत व दारूबंदी समितीच्या सदस्यांना मारहाण करून आरोपी शक्ती चंदन लिल्हारे (३०) रा. नवेगाव (पांढराबोडी) व केशरबाई मनोहर डहारे (४५) रा. पांढराबोडी यांनी त्यांच्यावर मिरची पूड टाकून त्यांना मारहाण केली. तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ३३४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी कमला दमाहे, विमला दमाहे, गायत्री दमाहे, राजेश दमाहे, आशिष दमाहे व इतर ४० महिला व पुरूषांनी केशरबाई यांच्या दुकानात जाऊन त्यांना शिविगाळ व मारहाण केली. या प्रकरणातील आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४५, १४७, १४९, २९४, ४२७,३२३,५०४,४५२ सहकलम ३७ (१), १३५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chilli Pudded in the eyes of the liquor party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.