चिमुकली पाहुले एकदिवसाआड शाळेच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:03+5:302021-02-14T04:27:03+5:30
शाळामधून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शाळा प्रशासनाने त्रिसूत्री नियमांचे प्रभावी पालन करण्याची कंबर कसली आहे. केशोरी हे गाव ...
शाळामधून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शाळा प्रशासनाने त्रिसूत्री नियमांचे प्रभावी पालन करण्याची कंबर कसली आहे. केशोरी हे गाव या परिसरातील अनेक खेड्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माहेरघर आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत या ठिकाणी विद्यार्थी येत असतात. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते शाळा सुटेपर्यंत शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी मोठ्या गंभीरतेने घेतल्या जात आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांकडे पालक भेटीच्या माध्यमातून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्रत्यक्ष भेटी देऊन उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न करून शाळेत विद्यार्थी येण्यासंबंधी आत्मविश्वास निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. शाळा प्रशासनाने कोरोना पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांवर विद्यार्थी पालकांनी विश्वास टाकून चिमुकल्यांची पावले एक दिवसाआड शाळेच्या दिशेने पडत आहेत. यामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.