सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:03+5:302021-05-12T04:30:03+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी ...
सडक-अर्जुनी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करावे, असे तहसीलदार उषा चौधरी यांनी कळविले आहे.
लस घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, असा गैरसमज काही ठिकाणी पसरला आहे, परंतु ते चुकीचे आहे. नागरिकांनी मनात कुठलाही गैरसमज न ठेवता व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करावे. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४० वयोगटांतील व्यक्तींसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या बाह्मणी, डोंगरगाव उपकेंद्र, डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या खजरी, पळसगाव उपकेंद्र, खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या चिखली, फुटाळा उपकेंद्र, पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या कोसमतोंडी, गिरोला उपकेंद्र आणि सौंदड येथील ग्रामीण रुग्णालय असा एकूण १३ केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील पात्र नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे तहसीलदार उषा चौधरी यांनी कळविले आहे.