नागरिकांनी सण-उत्सव शांततेत साजरे करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:07 PM2019-08-27T22:07:26+5:302019-08-27T22:11:52+5:30

सोमवारी(दि.२६) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित शांतता व सलोखा समितीच्या मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. पोळा (मारबत) उत्सव येत असून लगेचच गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवाचा मोहर्रम हा सण सुध्दा येत आहे.

Citizens should celebrate the festival in peace | नागरिकांनी सण-उत्सव शांततेत साजरे करावे

नागरिकांनी सण-उत्सव शांततेत साजरे करावे

Next
ठळक मुद्देमनोहर दाभाडे : शांतता समिती सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सणांचे दिवस सुरु असून ग्रामीण भागात या उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. नागरिक आपआपल्या परीने ही सण उत्सव साजरे करीत असतात. तेव्हा या काळात कोणतीही शांतता भंग होईल असे कार्य न करता नागरिकांनी सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांनी केले आहे.
सोमवारी(दि.२६) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात आयोजित शांतता व सलोखा समितीच्या मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. पोळा (मारबत) उत्सव येत असून लगेचच गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवाचा मोहर्रम हा सण सुध्दा येत आहे. ही सण, व्रत, उत्सव ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करण्यात येतात. त्यातच काही माथेफिरु गावातील शांतता व सलोखा भंग करुन शांतमय वातावरणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपले सण उत्सव आनंदाने साजरे करुन पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन दाभाडे यांनी केले.कायदा हातात घेऊन शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस प्रशासन कठोर कार्यवाही करेल असा इशारा सुध्दा त्यांनी यावेळी दिला.
गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व डी.जे.संचालक यांनी परवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करावे असे सांगितले. या वेळी शांतता व सलोखा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस मित्र,डी.जे.संचालक व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस हवालदार शेखर खोब्रागडे यांनी केले तर आभार मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Citizens should celebrate the festival in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस