वृक्षलागवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:03+5:302021-07-05T04:19:03+5:30

आमगाव : येथील गोंदिया रोडवरील यशवंतनगर येथे वृक्षलागवड व संवर्धनाचे ध्येय बाळगून वनविभाग व सामाजिक वनीकरण व नगरपरिषद ...

Citizens should take initiative for tree planting | वृक्षलागवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

वृक्षलागवडसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

Next

आमगाव : येथील गोंदिया रोडवरील यशवंतनगर येथे वृक्षलागवड व संवर्धनाचे ध्येय बाळगून वनविभाग व सामाजिक वनीकरण व नगरपरिषद यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (दि.४) घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कटकवार होते. यावेळी सामाजिक संघटनेचे यशवंत मानकर, रवि श्रीसागर, संजय बहेकार, भोला गुप्ता, महेश उके, प्रभा उपराडे, सुषमा भुजाडे, सुनंदा उके, वैशाली बडोले, राजेश अग्रवाल, राजेश शातनूरकर, राजेश देशमुख, येवले, खुमेन्द्र कटरे, रचिता राठोड, आदित्य उके, तेजराम उके, चौधरी, कथलेवार, राजू आंबेडारे, सुनील बडोले, विजय मेश्राम, रितेश अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमात विविध प्रजातींच्या शंभर रोपट्यांची लागवड करण्यात आली. प्रमोद कटकवार यांनी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवड व संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत मानकर यांनी केले.

Web Title: Citizens should take initiative for tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.