शहर भ्रमण करून भागवितात नागरिकांची तहान

By admin | Published: May 5, 2017 01:45 AM2017-05-05T01:45:53+5:302017-05-05T01:45:53+5:30

सद्यस्थितीत शहरात केवळ एक किंवा दोन जागीच प्याऊची सोय आहे. ही बाब लक्षात घेवून पाणीवाले शर्मा

Citizens thirsty to roam the city | शहर भ्रमण करून भागवितात नागरिकांची तहान

शहर भ्रमण करून भागवितात नागरिकांची तहान

Next

पाणीवाले शर्मा : चालत्या फिरत्या प्याऊचा शुभारंभ
गोंदिया : सद्यस्थितीत शहरात केवळ एक किंवा दोन जागीच प्याऊची सोय आहे. ही बाब लक्षात घेवून पाणीवाले शर्मा (प्रकाश शर्मा व प्रवीण शर्मा) यांनी टु-सीटर पँडल कार तयार करून त्यात चालता फिरता प्याऊ तयार केला. तसेच त्याद्वारे संपूर्ण शहर भ्रमण करून नागरिकांची तहान थंड पाण्याने भागविली जात आहे.
पूर्वी पाणी पाजणे पुण्याचे कार्य समजले जायचे. त्यासाठी शहर व गावांमध्ये प्याऊची स्थापना करून नि:शुल्क जलवितरण केले जात होते. काळासह पाणी बंद बाटलीमध्ये व पाऊचमध्ये उपलब्ध होवू लागले. त्यामुळे प्याऊची स्थापना बंद होवू लागली. आता शहरात अत्यल्प प्याऊ आहेत. ही बाब हेरून शर्मा बंधूंनी पैडल कार तयार करून त्यात चालता फिरता प्याऊ स्थापित केला व तहानलेल्या तहान भागविण्याचा प्रण घेतला. या चालत्या फिरत्या प्याऊमध्ये आरओद्वारे फिल्टर केलेला थंड पाणी नागरिकांची तहान भागविण्यासाठी सदैव असते.
सदर प्याऊचे उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. पैडल कारला त्यांनी स्वत: चालवूनही बघितले व सदर कार्याची प्रसंशा केली. संस्था संचालक प्रवीण शर्मा यांचे पूत्र सोहम शर्माद्वारे साकेत पब्लिक स्कूलमध्ये स्वच्छता अभियानांतर्गत एक मॉडेल (प्रतिकृती) तयार करण्यात आले होते. त्यात ड्राय गार्बेज कटरद्वारे आपल्या परिसरला कसे स्वच्छ ठेवले जाऊ शकते, याचे तंत्र होते. सदर मॉडेल साकेत पब्लिक स्कूलचे संचालक चेतन बजाज व सोहम शर्मा यांनी अशोक इंगळे यांना भेट दिले. त्यामागे सदर मॉडेल विस्तारित स्वरूपात तयार करून गोंदिया शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यात मदत व्हावी, हा हेतू होता.
यावेळी चेतन बजाज, प्रकाश खजांची, दिलीप गोपलानी, योगेश गिरीया, राहुल लोहाना, सुरेश अग्रवाल, कुशल चोपडा, किशनगोपाल खंडेलवाल, आलोक अग्रवाल, किरण नारनवरे, राजू खोखरे, लक्ष्मीनारायण टेंभरे आदी उपस्थित होते. आभार श्रीकिशन शर्मा यांनी मानले. प्याऊची नागरिकांनी वाहवा केली व त्या माध्यमाने आपली तहान भागविली.

Web Title: Citizens thirsty to roam the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.