वाॅर्ड क्रमांक २ च्या नागरिकांचा पाण्याकरीता टाहो ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:17+5:302021-03-23T04:31:17+5:30
आमगाव : स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील वार्ड नं. २ मध्ये मागील १४ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे वाॅर्डात पाण्याची ...
आमगाव : स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील वार्ड नं. २ मध्ये मागील १४ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे वाॅर्डात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याच समस्येला घेवून डॉ. तेजस्विनी भुस्कुटे यांच्या नेतृत्वात वाॅर्डातील महिलांनी सोमवारी नगरपरिषदचे प्रशासक व आमगावचे तहसीलदार डी.एस.भोयर यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
मागील सहा महिन्यांपासून पाण्याचा अनियमित पुरवठा करण्यात येत आहे. वारंवार नगर परिषदेला तक्रार करुन सुध्दा नगर परिषद पाण्याच्या समस्येकडे कानाडोळा करीत आहे. त्याचा त्रास वॉर्डातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाॅर्डात सार्वजनिक विहिरी किंवा बोअरवेल नसल्यामुळे महिलांची पाण्याकरीता भटकंती होत आहे. त्यामुळे नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन त्वरित नियमित पाणी पुरवठा करावा, दररोज टॅकर पाठवून पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात डॉ. तेजस्विनी भुस्कुटे, ममता बहेकार, ममता मंथनवार, मंजू बहेकार, उमा मेश्राम, अल्का मेश्राम, कल्पना आंबेडारे,जामूवंत हेमणे, विमला बहेकार, बडमे गुरुजी आदींचा समावेश होता.