बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:37+5:302021-06-17T04:20:37+5:30
महावितरणने विविध आकार व कर कमी करावे नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर ...
महावितरणने विविध आकार व कर कमी करावे
नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अवाच्या सव्वा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीजग्राहकांची आर्थिक लूट महावितरणने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
अल्पखर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी
अर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
गोरेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने याचा गोरगरिबांना फटका बसतो.
विडी उद्योगास उतरती कळा
गोंदिया : जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगास उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन द्या
बाराभाटी : कोरोनाच्या आपत्तीमुळे व्यवसाय, रोजगार बंद पडून आहेत. अशा परिस्थितीत निराधारांचे जगणे कठीण झाले. गावकऱ्यांना साधन उपलब्ध नसल्याने गावातून बाहेर निघणे कठीण झाले. अशा परिस्थितीत निराधार श्रावणबाळ योजनेचे मानधन लाभार्थ्यांना देण्यात यावे, तसेच मिनी बँकेच्या माध्यमातून गावागावांत अनुदान काढण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.