बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:14+5:302021-07-01T04:21:14+5:30

‘महावितरण’ने विविध आकार व कर कमी करावे नवे गावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध ...

Citizens were horrified by the changing environment | बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले

बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले

Next

‘महावितरण’ने विविध आकार व कर कमी करावे

नवे गावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीज ग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीजग्राहकांची आर्थिक लूट ‘महावितरण’ने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीज ग्राहकांनी केली आहे.

रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे तसेच, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडलेला असतो. रेती माफिया घाटांतून आणलेली रेती शहरातील वेगवेगळ्या भागांत टाकून देत आहेत.

रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ

सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत आहे. शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे.

दुग्ध व्यवसाय डबघाईस

अर्जुनी-मोरगाव : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या; परंतु आता पशुधनात प्रचंड घट झाली आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकी भागात उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.

सडक योजनेच्या रस्त्यांची दुरावस्था

तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

बोंडगावदेवी : शासनाने तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर या समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

नाल्यांवरचे अतिक्रमण काढा

गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या बंद झाल्या आहेत.

दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, विधवांना, तसेच आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Web Title: Citizens were horrified by the changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.