शहरवासीयांना सोडले देवाच्या भरवशावर

By admin | Published: October 10, 2016 12:37 AM2016-10-10T00:37:15+5:302016-10-10T00:37:15+5:30

शहरात १३०० रूपये प्रती तासाने धूळ साफ करणारी मशीन आणणाऱ्यांनी हा विचार केला नाही, की रस्तेच

The city dwellers left God's trust | शहरवासीयांना सोडले देवाच्या भरवशावर

शहरवासीयांना सोडले देवाच्या भरवशावर

Next

गोंदिया : शहरात १३०० रूपये प्रती तासाने धूळ साफ करणारी मशीन आणणाऱ्यांनी हा विचार केला नाही, की रस्तेच नाही तर ते मशीन कशावर चालविणार. शहर घाणीने माखले आहे, नाल्या बंद पडल्या आहेत, आजार आपले पाय पसरत आहे. असे असताना नगर परिषदेच्या भ्रष्ट प्रशासनाने मात्र शहरवासीयांना देवाच्या भरवशावर सोडून दिले असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून मंजूर छोटा गोंदियातील शास्त्री चौक हायमास्ट ते चावडी चौक रस्ता सिमेंटीकरण व शास्त्री चौक ते टेक्नीकल स्कूल पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अशा परिस्थितीत गप्प बसू शकत नाही, त्यामुळेच आम्ही आमच्याकडून शहर विकास व सुधारासाठी आपले प्रयत्न वाढवून विकास कामांचे शुभारंभ करीत आहेत. त्यामुळे क्षेत्रातील जनतेने खोटे आश्वासन देवून वाहवाही लुटणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, देवा रूसे, लक्ष्मीकांत डहाट, नफीस सिद्धीकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार महेश बिसेन यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. सुरेश सोनी, दिनेश मिश्रा, राजेश कापसे, भारती पटले, हेमराज बिसेन, भागवत मेश्राम, संतोष कुसराम, युवराज राऊत, सुनिल पटले, किसन भगत, छोटू बिसेन, तिर्थराज उके, दीपल अग्रवाल, आनंद राहूलकर, देवेंद्र अग्रवाल, मनोज भैसारे, राजू दोनोडे, उमेश सोनवाने आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
 

Web Title: The city dwellers left God's trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.