शहरात रंगली लावणी नृत्य, मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा

By admin | Published: April 7, 2016 01:52 AM2016-04-07T01:52:19+5:302016-04-07T01:52:19+5:30

आधार महिला संघटन व लायनेस क्लबच्या वतीने केमिस्ट भवनात लावणी नृत्य, मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा घेण्यात आल्या.

In the city, lavaty dance, Miss and Mrs. Gondiya contest | शहरात रंगली लावणी नृत्य, मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा

शहरात रंगली लावणी नृत्य, मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा

Next

४७ महिलांचा सहभाग : तेजस्विनी, हिमेश्वरी, कंचन व देवयानी विजयी
गोंदिया : आधार महिला संघटन व लायनेस क्लबच्या वतीने केमिस्ट भवनात लावणी नृत्य, मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा घेण्यात आल्या. यात ४७ महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धा दोन भागात घेण्यात आल्या. यात मिस लावणी व मिसेस लावणी नृत्य तसेच मिस गोंदिया व मिसेस गोंदिया यांचा समावेश होता.
उद्घाटन सविता विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भावना कदम होत्या. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, शीला धोटे, सुवर्णा हुबेकर, माधुरी नासरे, राणू रहांगडाले, सविता संजय पुराम, संगीता गुहा, द्वारका सावंत, सविता बेदरकर, गीता क्षत्रिय, नीला ढोक, अंजू जायस्वाल, आशा माहोरे, मंजुषा कार्लेकर, करूणा श्रीवास्तव, सुषमा गुजर, सीमा डोये, भारती धोटे उपस्थित होते.
मिस लावणी प्रथम तेजस्विनी गणवीर, द्वितीय मोहिनी श्रीखंडे, तृतीय शानू बांडेपुचे, मिसेस लावणीमध्ये प्रथम हिमेश्वरी कावळे, द्वितीय श्रृती केकत, तृतीय काजल माधवानी तसेच मिस गोंदियामध्ये प्रथम कंचन अडवाणी, द्वितीय खुशबू शिवणकर, तृती निधी बैतुले, मिसेस गोंदियामध्ये प्रथम देवयानी उमरे, द्वितीय वंदना काळे, तृतीय अर्चना गौतम निवडून आल्या. त्यांचा सन्मान बेल्ट व डोक्यावर ताज घालून करण्यात आला.
यात सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण शीला धोटे, माधुरी नासरे, द्वारका सावंत, सीमा डोये, गीता क्षत्रिय, संगीता गुहा यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा सहा तास चालली. यात ५०० महिलांची उपस्थिती होती.
निरीक्षक म्हणून स्रेहा मानकर, ललित मानकर, सोनाली पडोळे, रेखा भोंगाडे यांनी काम सांभाळले. संचालन सुजाता बहेकार व सीमा बैतुले यांनी केले. आभार भावना कदम व लता वाजपेयी यांनी मानले. कार्यक्रमासाठी लता वाजपेयी, नीता क्षत्रिय, प्रज्ञा मेहता, पूनम अरोरा, कृतिका थेठ, कश्मिरा संघाणी, कुंदा दोनोडे, शारदा ब्राह्मणकर, वंदना नेचवाणी, पूजा तिवारी, रिना अग्रवाल, दीपा काशिवार, सुनिता धरमशहारे, सविता तुरकर, प्रीती येटरे, छाया देशमुख, अनिता चौरावार, वैशाली गिऱ्हेपुंजे, तनवी श्रीरामे, वंदना घाटे, संध्या कटरे, शिवानी चव्हाण, उषा येटरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: In the city, lavaty dance, Miss and Mrs. Gondiya contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.