शहराला पावसाने झोडपले
By admin | Published: August 6, 2016 02:36 AM2016-08-06T02:36:03+5:302016-08-06T02:36:03+5:30
शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नवी मुंबईकरांचे पुरते हाल झाले.
गोठणगाव : येथील पोलिस सशस्त्र दूर क्षेत्राच्यावतीने मंगळवारी नक्षल सप्ताहाच्या विरोधात भव्य ‘शांतता रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली दिनदयाल उपाध्याय आश्रमशाळा येथून निघून गावातील मुख्य रस्त्यावरुन निघाली व गावातील चौका-चौकांत रॅलीचे गावकऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या हात फलक रॅलीचे आकर्षण ठरत होते व रॅलीमध्ये गावातील नागरिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होते.
ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, तंमुसचे सर्व पदाधिकारी, आश्रमशाळेचे कर्मचारी व शिक्षक गावातील पुरुष, महिला विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित होते. शेवटी सशस्त्र दुर क्षेत्राच्या गेटवर रॅलीत सहभागी लोकांचे स्वागत करण्यात आले. पोलिस केंद्राच्या प्रांगणात सर्वप्रथम पोलिस सशस्त्र केंद्राचे प्रभारी पीएसआय जाफर, पीएसआय बायस यांनी शांतता रॅलीचे उद्देश व फायदे यावर मार्गदर्शन केले. लगेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक संतोष राठी यांनी शांतता रॅलीचे महत्व पटवून दिले.
एसआरपीएफचे जवान सोनवाने यांनी ३ नॉट ३, इंसास, एस.एल.आर, एके ४७, पिस्टल, युबीजीएल या शस्त्रांबद्दल माहिती व उपयोग पटवून दिले. रॅलीसाठी दिनदयाल उपाध्याय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व कर्मचारी व मोहन टेंभरे, प्रेमानंद टेंभुर्णे, कल्पेश चव्हाण, खेमराज कोडापे, अजय रहांगडाले, प्रमोद चव्हाण व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस उप निरीक्षक बायस यांनी सर्वांचे आभार मानले. (वार्ताहर)