पावसाळ्यात तुंबणार शहरात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:42+5:30

सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालयपर्यतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असल्याने रस्त्याच्या बाजुला सिमेंट क्राँक्रीटच्या नाल्या असणार म्हणून कंत्राटदाराने काही तुटक ठिकाणी फार मोठ्या नाल्या खोदून ठेवल्या. त्या अर्धवट बांधलेल्या नाल्याच्या दोन्ही बाजूला चार ते सहा फूट खोल दरी निर्माण झाली आहे. मात्र नाल्यांच्या बाजूची दरी बुजविण्याचे काम कंत्राटदाराने केले नाही. त्यात अनेक नागरिक जनावरे पडत आहे. परंतु कंत्राटदार आणि सबंधीत अधिकारी मुंग गिळून बसले आहे.

The city will be flooded during the rainy season | पावसाळ्यात तुंबणार शहरात पाणी

पावसाळ्यात तुंबणार शहरात पाणी

Next
ठळक मुद्देनाली व रस्त्याचे अर्धवट बांधकाम : कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे नगरपंचायत अडचणीत

राजकुमार भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी ते शेंडा रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरु आहे. कंत्राटदाराने सडक-अर्जुनी नगरपंचायतच्या हद्दीत अर्धवट व कोणतेही लेव्हल नसलेल्या नाल्या खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्या तुडुंब भरुन नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडे धाव घेत असल्याने सडक-अर्जुनी नगरपंचायत अडचणीत आली आहे.
सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालयपर्यतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असल्याने रस्त्याच्या बाजुला सिमेंट क्राँक्रीटच्या नाल्या असणार म्हणून कंत्राटदाराने काही तुटक ठिकाणी फार मोठ्या नाल्या खोदून ठेवल्या. त्या अर्धवट बांधलेल्या नाल्याच्या दोन्ही बाजूला चार ते सहा फूट खोल दरी निर्माण झाली आहे. मात्र नाल्यांच्या बाजूची दरी बुजविण्याचे काम कंत्राटदाराने केले नाही. त्यात अनेक नागरिक जनावरे पडत आहे. परंतु कंत्राटदार आणि सबंधीत अधिकारी मुंग गिळून बसले आहे. अताशा आशीर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम असून त्या कामाची अंदाजे किंमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये दोन किलोमीटर एवढा रस्ता सिमेंट काँक्रीटचा असेल आणि इतर रस्ता रुंदीकरण आहे. सिंमेट रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट असल्याचेही सांगण्यात आले.कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम पूर्ण करण्याचा कालावधी हा १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी काम करणारी यंत्रणाच सदर कंत्राटदाराकडे उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील काही अकुशल कामगार कामावर ठेवून रस्त्याचे काम सुरु असल्याचे भासविल्या जात आहे. परंतु खोदून ठेवलेल्या नाल्याच्या बाजूची रिकामी जागा दोन वर्षापासून सदर कंत्राटदार भरु शकत नसेल तर अशा कंत्राटदाराचे काम काढून दुसऱ्या कंत्राटदाराकडे देण्यात यावे, जेणेकरुन नागरिकांना त्रास होणार नाही. सडक-अर्जुनी ते शेंडा रस्ता हा केसलवाडा, रेंगेपार, उशिखेडा, अपकारीटोला, कन्हारपायली, शेंडा अशा गावांना जाणारा रस्ता आहे. या गावावरुन येणाºया-जाणाºया प्रवाशांना जिव मुठीत घेवून या रस्त्यांने प्रवास करावा लागतो. अनेक प्रवासी संबंधित काम करणाºया यंत्रणेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष व्यक्त करित आहे. विकास कामाच्या नावावर नागरिकांच्या समस्या कशा थांबतील याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. परंतु निवडून गेलेले राजकीय नेते, नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देण्याऐवजी आपले भले कसे होईल याकडे लागलेले असतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवाच्या असेल तर नागरिकांनीच स्वत: रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.

पाच महिन्यात कामे पूर्ण होणार का?
सदर कामाचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२० पर्यंतच असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी फक्त पाच महिनेच शिल्लक राहिले आहे.जे काम दीड वर्षात पूर्ण होवू शकले नाही. ते काम पाच महिन्यात कसे पूर्ण करणार. त्यामुळे नगरपंचायतने आपल्या गावच्या हद्दीतील नाल्याचे पाणी लोकांच्या घरात घुसणार नाही आणि त्यांना अडचण होणार नाही याची काळजी घेऊन नगरपंचायतने स्वत: नालीबांधकाम करण्याचे पाऊल उचलण्याची गरज आहे.

नगरपंचायत सडक-अर्जुनी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय सावंगी सडक-अर्जुनी यांना पत्र पाठवून सदर कामाविषयी विचारणा केली व अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करावे असे सांगण्यात आले आहे.
- डॉ. विवेक मेश्राम, मुख्याधिकारी सडक-अर्जुनी नगर पंचायत

अर्धवट राहिलेली कामे लवकर व व्यवस्थित करावी. अशा सूचना वारंवार कंत्राटदाराला दिल्या आहे. परंतु कंत्राटदार कामाकडे लक्ष देत नाही.
-प्रकाश लांजेवार, उपविभागीय अभियंता, सावंगी सडक-अर्जुनी

Web Title: The city will be flooded during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.