शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:03 PM2017-11-11T22:03:32+5:302017-11-11T22:03:43+5:30

शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते.

The city's traffic congestion will continue | शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार

शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार

Next
ठळक मुद्देपोलीस प्रशासनाने घेतली दखल : नो पार्किंग झोनमध्ये जड वाहनाना प्रवेश बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते. यासर्व गोष्टींची जाणीेव उशीरा का होईना पोलीस प्रशासनाला झाली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यासाठी नागपूर शहरातील फार्मुला वापरला जाणार असल्याची माहिती आहे.
शहराच्या मध्यभागी भाजीबाजार व प्रमुख बाजारपेठ असल्याने त्या भागात दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. औद्योगिक विकासामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातुलनेत रस्ते मात्र अरुंद व जुनेच आहे. मुख्य बाजारपेठेत जड वाहने, माल वाहतुक वाहने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, हातठेले, रिक्षा ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र सहज पाहयला मिळते. सामान्य जनतेला यामुळे होणारी अडचण व सुरक्षीततेच्या दृष्टीने वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा समस्या मार्गी लावण्याची गरज होती.
पोलीस विभागाने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी यासाठी एक अधिसूचना देखील काढली आहे. शहरातील सर्व बसस्थानके व बसथांबे यांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर अवैध प्रवासी वाहतुक करणाºया वाहनांसाठी नो पार्र्कींग झोन क्षेत्र कायम ठेवले आहे.
जयस्तंभ चौक ते रेल्वे क्रॉसींग मरारटोली या राज्य महामार्गावरील तसेच जयस्तंभ चौक ते फुलचूर नाका या राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूस जड मालवाहतूक वाहनांसाठी जाहीर केलेले नो पार्र्कींग झोन यापुढेही कायम राहील.
जड वाहनांना प्रवेश बंदी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी, दुचाकी वाहनांसाठी सम-विषम तारखांना पार्र्कींग दुचाकी वाहनांसाठी वन साईड पार्र्कींग, जड वाहनांसाठी पार्र्कींग झोन, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्र्कींग झोनसाठी वाहतुक नियमावली निश्चित केली आहे.
सम-विषम पार्किंग सुविधा
नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम विषम पार्र्कींग व्यवस्थेचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे बºयाच प्रमाणात वाहतुक व्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत झाली. तोच प्रयोग आता गोंदिया शहरात राबविण्यात येणार आहे. दुचाकी वाहनांसाठी सम-विषम तारखांना पार्र्कींगची व्यवस्था निश्चित केली आहे. रस्ता क्र .१२ : गांधी प्रतिमा-गोरेलाल चौक या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्र्कींग, विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१३ : गोरेलाल चौक-ख्वाजा मस्जीद या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्र्कींग व विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१४ : गोरेलाल चौक-दुर्गा चौक या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्र्कींग-विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१५ : श्री टॉकीज-जैन मंदिर-फर्निचर दुकान या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्र्कींग व विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्र्कींग राहील.
या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी
सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. रस्ता क्र .१ : गुरु नानक गेट ते गांधी चौक-चांदणी चौक - राजस्थान कन्या विद्यालय पर्यंतचा पूर्व भाग, रस्ता क्र .२ : छत्रपती शिवाजी चौक - गांधी चौक - गोरेलाल चौक -श्री टॉकीज चौक पर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ३ : महाराणा प्रताप चौक - दीपक ट्रान्सपोर्टकडे जाणारा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ४ : कृषी उत्पन्न बाजार समिती - चांदणी चौक - दुर्गा चौक - रेल्वे लोखंडी सिडीपर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ५ : भारतमाता चौक - गोयल चौक - भाजीबाजाराकडे जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र .६ : श्री बाबुजी बजरंगव्यायाम शाळा चौक - मारवाडी चौकपर्यंत जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र .८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - सुभाष शाळेकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र .८ : पं.जवाहरलाल नेहरु चौक - दुर्गा चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र .९ : कुडवा नाका - धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय- एन.एम.डी.कॉलेज पाल चौकपर्यंत जाणारा उत्तर दक्षिण मार्ग, रस्ता क्र .९ अ : शक्ती चौक-गुरु द्वारा गुजराती हायस्कूल पाल चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहील.
जड वाहनासाठी मार्ग निश्चित
जड वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये गुरु नानक गेट-मोदी पेट्रोलपंप-शिवाजी चौक-महाराणा प्रताप चौक-कृषी उत्पन्न बाजार समिती-सिंधी हायस्कूल-एफसीआयकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग आणि कुडवा नाका-अवंती चौक रेल्वे क्र ॉसींग-मरारटोली चौक-शक्ती चौक-रेल्वे स्टेशन-रेल्वे मालधक्का या मार्गाचा समावेश आहे.

Web Title: The city's traffic congestion will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.