नगर परिषदेत घरकूल घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:40 PM2018-02-19T22:40:55+5:302018-02-19T22:41:10+5:30

नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Civic scam in city council | नगर परिषदेत घरकूल घोटाळा

नगर परिषदेत घरकूल घोटाळा

Next
ठळक मुद्देगरिबांऐवजी मोठ्यांना लाभ : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमत
तिरोडा : नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊ शकते. सदर घरकुल शौचालयाचे प्रकरण मोठ्या नेत्यापासून दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अखील भारतीय मानवाधिकार असोसिएशन गोंदिया जिल्हा प्रा. सी.जी. कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
नगर परिषद क्षेत्रातील गरीब, दलीत, आदिवासी, ज्यांच्याजवळ घर नाही, क्षतीग्रस्त अशांना देणे आवश्यक होते. पण ज्यांच्याजवळ पक्के घर, राहण्यासाठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. त्यांनी मजल्यावर मजला चढवून बंगला तयार केले आहे. अंदाजपत्रकानुसार घरकुल तयार न करता बंगले तयार केले आहे.
एका परिवारातील पत्नी, पती, मुलगा, सुन, नातूच्या नावानेही पाच पाच घरे दिली आहेत. जागा एकच तीच जागा दाखवून घर तयार केले. नगर परिषदेत काम करणारे कर्मचारी यांना देखील घरकुलाचे वाटप करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसºयांची जमिनी दाखवून शौचालय वेगळे दाखवून १२ हजार रुपयांचा लाभ दिला आहे. घरकुलात शौचालय समाविष्ठ असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करुन संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी मानवाधिकारा संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.
अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर उपषोणावर बसण्याचा इशारा दिला आहे. नाली, रस्ता, बाजार निलामी यातही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Civic scam in city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.