नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:43 AM2017-07-21T01:43:47+5:302017-07-21T01:43:47+5:30

शहरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेने बिकट समस्येचे रूप धारण केले आहे. कित्येक विहिरी व बोअरवेलमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनात आले आहे.

Civil health risks | नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

बिकट समस्या : सार्वजनिक विहिरी व बोअरवेलमध्ये दूषित पाणी
राजीव फुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शहरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेने बिकट समस्येचे रूप धारण केले आहे. कित्येक विहिरी व बोअरवेलमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनात आले आहे.
तालुक्यातील रिसामा गावातील विहिरींजवळ गवताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील पाण्याचा वापर करणे म्हणजे आजारांनाच आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. तसेच बनगाव ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक ३ मधील विहिरीत अशुध्द पाणी आहे. तेथील पाणी दूषित झाले असून नागरिकांनी पाण्याचा वापर करणे बंद केले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली असून संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विहिरीजवळ सर्वत्र घाण पसरलेली आहे. त्याठिकाणी नाली वाहत असल्याने तेथील दूषित पाणी व्यापारी व ग्राहकांना मिळत आहे.
नगरातील सुंदर नगर (बरौगी मोहला) येथील विहीर १५ फुट रुंद असून त्याठिकाणी ८-१० मोटारपंप लागलेले आहेत. शासकीय विहिरीवर खासगी पंप लावण्यात आल्याने परिसरातील लोकांना नेहमीच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असते. येथील पाणी दूषित असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्याठिकाणी जवळील शौचालयाचे पाणी झिरपत असल्याने पाण्याचा रंग हिरवागार दिसून येतो. येथील पाणी दूषित असल्याने जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
येथील विहिरीजवळील दूषित पाणी व घाण यामुळे विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी नागरिकांना याच पाण्यावर आपले दिवस काढावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने दखल घेवून योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

Web Title: Civil health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.