रस्त्याच्या कडेला असलेली घाण करतो स्वच्छ
By admin | Published: September 18, 2016 12:32 AM2016-09-18T00:32:55+5:302016-09-18T00:32:55+5:30
रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड घालून त्याची स्वच्छता करण्याचे कार्य एक अज्ञात व्यक्ती करीत आहे.
स्वच्छतादूत : ग्रामीण भागात देतो ‘जागा हो’चा नारा
ुबाराभाटी : रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड घालून त्याची स्वच्छता करण्याचे कार्य एक अज्ञात व्यक्ती करीत आहे. मागील महिनाभरापासून त्याचे हे कार्य सुरू असून ‘जागा हो जागा’ असा नारा देत हा स्वच्छता दूत फिरत आहे.
उघड्यावरील शौचावर लगाम लागावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र जोवर प्रत्येक व्यक्ती याबाबत ठाम होणार नाहीत तोवर या प्रकारावर आळा बसणार नाही हे सुद्धा तेवढेच खरे आहे. हाच निर्धार धरून एक युवक मागील महिनाभरापासून परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड टाकून त्यांना नाहीशी करीत स्वच्छेतेचे कार्य करीत आहे. सायकलवर फिरून हा युवक ‘जागा हो जागा’ चा नारा देत आपले काम करून निघून जाते.
प्रसिद्धीचा हव्यास व पुरस्काराचे स्वार्थ न बाळगता हा युवक आपले करून निघून जात असल्याने त्याला स्वच्छतादूत म्हटले जात आहे. तो आपले नाव सांगत नाही, करी छायाचित्र काढू देत नाही. वृत्तपत्रातून प्रकाशझोतात यायचे नाही असे तो स्पष्ट बोलतो व काम आटोपून निघून जातो. (वार्ताहर)
उघड्यावर शौच करू नका
लोकांची विष्ठा स्वच्छ करण्याचे काम करीत असलेला हा युवक या कार्यासोबतच लोकांत जनजागृती करण्याचे काम करीत आहे. रस्त्यावर शौच करून नका व स्वच्छता राखा असा संदेश तो देतो. आपल्या सायकलवरून सुमारे ५० गावे पालथी घालत तो लोकांना जागृत करण्याचे पवित्र कार्य करीत आहे.