नाल्या, गटारे आठवडाभरात स्वच्छ करा

By admin | Published: May 26, 2016 12:41 AM2016-05-26T00:41:51+5:302016-05-26T00:41:51+5:30

जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली.

Clean the gutters, gutters in the week | नाल्या, गटारे आठवडाभरात स्वच्छ करा

नाल्या, गटारे आठवडाभरात स्वच्छ करा

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेची शहरात पाहणी
गोंदिया : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसात नाले, गटारे स्वच्छ करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले.
गोंदियातील बाजपेयी चौक, सूर्याटोला, संजयनगर, मरारटोली यासह अन्य भागांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या वस्त्यांचे क्षेत्र कसे कमी होईल यादृष्टीने लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्याच्या दिवसात उघडे गटार, तसेच भूमीगत गटार कचऱ्याने तुंबणार नाही यासाठी नगर परिषदेने विशेष काळजी घ्यावी. नाल्या पाण्यामुळे तुंबून घाण पाणी रस्त्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहणार नाही याचे नियोजन करण्याचे सांगितले. पॉलिथीनमुळे मोठ्या प्रमाणात गटारे तुंबत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी नगर परिषदेने आतापासून नाले गटारे, कचरा कुंड्या स्वच्छ ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा योजनेचे पाईप लाईन लिकेज होऊन नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ येणार नाही यासाठी अशा लिकेज असलेल्या पाईप लाईन तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक वार्डातील नागरिकांनी कचर्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी नगर परिषदेचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.डी.मेश्राम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Clean the gutters, gutters in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.