शहरात स्वच्छता फक्त सर्वेक्षणापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:20 AM2019-03-18T00:20:57+5:302019-03-18T00:21:22+5:30

आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

Cleanliness in the city only | शहरात स्वच्छता फक्त सर्वेक्षणापुरतीच

शहरात स्वच्छता फक्त सर्वेक्षणापुरतीच

Next
ठळक मुद्देबघावे तेथे कचऱ्याचे ढीग : शहरवासीयांच्या उमटताहेत प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मात्र गोंदिया शहराला याच्याशी काहीच देणे-घेणे दिसून येत नाही. कारण शहरात फक्त सर्वेक्षणापुरतीच स्वच्छता केली जात असल्याचे दिसते. हेच कारण आहे की, आज शहरात बघावे तेथे कचऱ्याचे ढीग दिसून येत असून शहर किती स्वच्छ आहे याची प्रचिती येते.
उत्तम आरोग्यासाठी आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. यातून गावच काय शहरही स्वच्छ असावे व देशवासीयांना शुद्ध वातावरणात श्वास घेता यावा यासाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. या मोहिमेंतर्गत गावांपासून ते शहरांसाठी काही निकष ठरवून देत त्यावर रँकींग केले जाते. यासाठी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. शासनाची योजना असल्याने कित्येक गाव व शहरांकडून त्यात हिरीरीने भाग घेवून काही चांगले करण्याचा इमानदारीने प्रयत्न केला जातो. तर काही मात्र करायचे आहे म्हणून करतात असे ही बघावयास मिळते.
गोंदिया नगर परिषदेच्या बाबतीतही तसेच काही घडून येत असल्याचे खुद्द शहरवासी बोलत असून तशीच काहीशी स्थितीही बघावयास मिळते. नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिमेच्या काळात मोठा जोर लावला जातो.
स्वच्छतेसाठी विविध प्रकारे धडपड करून आपले शहर स्वच्छ दिसावे यासाठी केवीलवाने प्रयत्न केले जातात. समिती सर्वेक्षणासाठी येताना त्यांना खूश करण्यासाठी होर्डींगबाजीपासून तर कचराकुंड्या लावणे, रात्रीची सफाई व अन्य प्रयोग केले जातात.
हेच सर्व काही यावर्षीही घडले. मात्र यंदा समितीने शहराची व नगर परिषदेच्या या थातूरमातूर प्रयत्नांची वास्तवीकता जाणून घेतली. परिणामी, यंदाच्या सर्वेक्षणात शहराचे रँकींग घसरले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलीच घसरण झाल्याने नगर परिषद स्वच्छता विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती समितीने अवघ्या शहरवासीयांना दाखवून दिली. म्हणूनच, शहरात फक्त स्वच्छ सर्वेक्षमापुरतीच स्वच्छता होत असल्याचे आता शहरवासी बोलत आहेत.
फक्त पैशांची उधळण
स्वच्छ सर्वेक्षणाच्या काळात नगर परिषदेकडून स्वच्छता विषयक कामे करण्यासाठी फक्त पैशांची उधळण केली जात असल्याचे दिसते. होर्डींगबाजीवरच लाखो रूपये ओतले जातात. जनजागृतीसाठी गावात पोंगे फिरवून त्यावर पैसे खर्च केले जातात. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी कंटेनर लावणे तर सिमेंटच्या कुंड्या तयार करणे यावर पैसे ओतले जात असल्याचे दिसले. विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना ‘जीआर’ मध्येच तरतूद असल्याचे बोलून हात मोकळे केले जात आहे.

Web Title: Cleanliness in the city only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.