चार गावातील नागरिकांचा स्वच्छाग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:07 PM2019-06-25T22:07:13+5:302019-06-25T22:08:55+5:30

गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प केला.

Cleanliness of four villages | चार गावातील नागरिकांचा स्वच्छाग्रह

चार गावातील नागरिकांचा स्वच्छाग्रह

Next
ठळक मुद्देस्वच्छतेसाठी पुढाकार : गावकऱ्यांचा वाढतोय सहभाग, स्वच्छतेचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकऱ्यांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प केला.
अदानी फाऊंडेशन तिरोडाव्दारा अदानी विद्युत प्रकल्प प्रमुख सी.पी.साहू व आँपरेशन अँन्ड मेन्टनन्स हेड अरिन्दम चटर्जी याच्यां मार्गदर्शनाखाली तसेच चन्द्रेश शुक्ला, परिबर शहा, अशोक कुमार मिश्रा व हरीप्रसाद अडथळे आणि अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील चुरडी, गराडा, चिखली व भिवापुर या गांवामध्ये स्वच्छाग्रह कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
कार्यक्रमातंर्गत चारही गावातील नागरिकांसह अदानी प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छाग्रहाची शपथ घेऊन गावाची स्वच्छता केली. तसेच गावांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विविध महापुरूषांच्या वेशभुषा परिधान करुन विद्यार्थी प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. काही विधार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला उपस्थित नागरीकांच्या हस्ते शाळा व ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छाग्रह उपक्र माविषयी सांगताना साहु म्हणाले, ज्याप्रमाणे गांधीजींची सत्याग्रह चळवळ सत्याचा आग्रह धरणारी होती त्याच धरतीवर अदानी फाऊंडेशनचा स्वच्छाग्रह हा कार्यक्र म स्वच्छतेचा आग्रह धरणारा असल्याचे सांगितले. कार्यक्रमामध्ये गांवातील महिला बचत गट, भजन मंडळ, युवक मंडळ, नागरीक तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्र मासाठी सरपंच छाया रंगारी, जगदेव आमकर, दुर्गा भगत, पल्लवी भोयर, यांच्यासह सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य आणि गावकरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Cleanliness of four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.