स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:38 PM2017-12-05T22:38:14+5:302017-12-05T22:38:30+5:30

रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९ होती.

In the cleanliness of Gondia railway station at 83rd position | स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

Next
ठळक मुद्देवर्षभरात विविध सुधारणा : मागील वर्षाच्या तुलनेत घेतली भरारी

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९ होती. परंतु सन २०१७ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग ८३ झालेली आहे. केवळ एका वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाने रेटिंगमध्ये १८९ वरुन ८३ व्या स्थानावर भर घेतली आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. मागील वर्षभरात रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे स्थानकावर विविध उपाय योजना केल्या. रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेवर अधिक भर दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या रेटिंगमध्ये रेल्वे स्थानकाने चांगली प्रगती केली आहे. मुंबई ते हावडापर्यंत प्रवास करणाºया प्रवाशांना नेहमीच गोंदिया रेल्वे स्थानकातील स्वच्छता व्यवस्था आवडते. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या स्वच्छता अभियान रेल्वेची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देश आणि निरीक्षणामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्वच्छतेच्या बाबतीत कायापालट झाला आहे.परिणामी गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे अधिकारीसुद्धा विशेष लक्ष देत आहेत.गोंदिया रेल्वे स्थानकाकडून आता वरिष्ठ अधिकाºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच आता रेल्वे स्थानकाच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी ७९ कर्मचाºयांच्या नियुक्तीची निविदा ६ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. श्रीनिवास हॉस्पिटलिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. नागपूरला सदर टेंडर देण्यात आले आहे.
आधी केवळ ३४ कर्मचारी असतानाही गोंदिया रेल्वे स्थानकाने ८३ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने देखील आता येथील स्वच्छताविषयक कामाकरिता असलेल्या कर्मचाºयांच्या संख्येत दुप्पट वाढ केली आहे.

रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात वाढ
गोंदिया रेल्वे स्थानकावर दररोज शंभरावर प्रवासी गाड्या धावतात. या स्थानकावरुन प्रवास करणाºया प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आॅक्टोबर महिन्यापर्यंत १० कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: In the cleanliness of Gondia railway station at 83rd position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.