कचरा सुपाच्या वाणातून स्वच्छतेचा संदेश

By admin | Published: January 23, 2017 12:23 AM2017-01-23T00:23:53+5:302017-01-23T00:23:53+5:30

शहराच्या प्रभाग क्र.६ येथील नगरसेविका भावना दीपक कदम यांच्या आधार महिला शक्ती संघटनेच्या वतीने

Cleanliness message from garbage suppressant | कचरा सुपाच्या वाणातून स्वच्छतेचा संदेश

कचरा सुपाच्या वाणातून स्वच्छतेचा संदेश

Next

भावना कदम यांचा उपक्रम : १५०० महिलांना सुपाचे वाटप
गोंदिया : शहराच्या प्रभाग क्र.६ येथील नगरसेविका भावना दीपक कदम यांच्या आधार महिला शक्ती संघटनेच्या वतीने मकर संक्रातीचे औचित्य साधून परिसरातील महिलांना हळदी-कुकूंच्या माध्यमातून वाणाच्या रुपात जवळपास १५०० महिलांना कचरा-सुपाचे वाटप करण्यात आले.
आपल्या घरचा कचरा एकत्रित जमा करुन डस्टबीनमध्ये जमा करा व स्वच्छता गाडीला देऊन आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश नगरसेविका कदम यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेविका भावना कदम यांनी केलेल्या कामांच्या आधारे दुसऱ्यांदा ४०० मतांनी निवडून आल्या. आपला प्रभाग सुंदर प्रभाग या संकल्पनेतून त्या कार्य करतात. मागील वर्षी त्यांनी परिसरातील महिलांना डस्टबीनचे वाटप केले होते हे विशेष.
कार्यक्रमासाठी सुनंदा कदम, प्रिया सावंत, सिमा जाधव, सुवर्णा कदम, कृपा कदम, प्रिती शेळके, कनिका अग्रवाल, बबीता ढाले, उमा महाजन, दीपा काशिवार, मिना हुकरे, योगीता लिल्हारे, पुनम लिल्हारे, शुभांगी कदम, पूजा तिवारी, रचना वैद्य, सुजाता बहेकार, माया राघोर्ते, रिना यादव, मंजू दोनोडे, वंदना घाटे, सहित अनेक महिलांनी सहकार्य केले.
उपस्थित महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांचे आभार नगरसेविका कदम यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness message from garbage suppressant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.