स्वच्छता सर्वेक्षणाला झाली सुरूवात

By Admin | Published: January 18, 2017 01:16 AM2017-01-18T01:16:24+5:302017-01-18T01:16:24+5:30

शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे,

Cleanliness survey started | स्वच्छता सर्वेक्षणाला झाली सुरूवात

स्वच्छता सर्वेक्षणाला झाली सुरूवात

googlenewsNext

पथकातील दोघांचे आगमन : गुरूवारपर्यंत होणार सर्वेक्षण
गोंदिया : शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी मंगळवारपासून (दि.१७) शहरात स्वच्छता सर्वेक्षणाला सुरूवात झाली. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण केले जात असून यासाठी पथकातील दोघांचे मंगळवारी आगमन झाले.
अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे.
यातूनच स्वच्छता सर्वेक्षण हा नवा प्रयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हा प्रयोग केला जाणार असून यांतर्गत राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा असून यात गोंदिया शहराचीही निवड करण्यात आली आहे. यांतर्गत मंगळवारी (दि.१७) पथकातील कमलेश मिशाद व अंजन यादव या दोघांचे शहरात आगमन झाले व त्यांनी आपले काम सुरू केले. येत्या गुरूवारपर्यंत (दि.१९) हे सर्वेक्षण केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

या भागांची केली पाहणी
या सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेकडून माहिती मागविण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे पथकातील कमलेश मिशाद यांनी शहरातील शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया, अंगूर बगिचा व मोक्षधाम परिसरातील रस्ते व स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक मुकेश शेंद्रे व अन्य कर्मचारी होते.

 

Web Title: Cleanliness survey started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.