स्वच्छताग्रहातून गावकऱ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:06 PM2018-08-27T22:06:40+5:302018-08-27T22:07:05+5:30

महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रह आंदोलनाची प्रेरणा घेवून अदानी फाऊंडेशनने २०१५ मध्ये स्वच्छाग्रह उपक्रमाची सुरूवात केली. हाच उपक्रम आता फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यात स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे.

Cleanliness of the villagers from cleanliness drive | स्वच्छताग्रहातून गावकऱ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

स्वच्छताग्रहातून गावकऱ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

Next
ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा उपक्रम : गावकऱ्यांमध्ये जनजागृती, २५० शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रह आंदोलनाची प्रेरणा घेवून अदानी फाऊंडेशनने २०१५ मध्ये स्वच्छाग्रह उपक्रमाची सुरूवात केली. हाच उपक्रम आता फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यात स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे.
स्वच्छाग्रह अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५० हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे. या अभियानातंर्गत गावात गावात जाऊन गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच फाऊंडेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी सुध्दा गावात स्वच्छता अभियान राबवित आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अभियनाविषयी माहिती दिली. या वेळी गटशिक्षणाधिकारी एल.एल.मोहबंशी, पी.पी.समरीत, बालकृष्ण बिसेन, अदानी स्टेशन हेड सी.पी.साहू, समीर मिश्रा, नितीन शिराळकर उपस्थित होते. या वेळी अहमदाबाद येथील अदानी फाऊंडेशन स्वच्छाग्रह कार्यक्रमाचे प्रमुख जिग्नेश विभांडीक प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान त्यांनी स्वच्छाग्रह उपक्रमावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत अदानी फाऊंडेशनच्या सभागृहात प्राचार्य व शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना हरिखेडे म्हणाले, स्वच्छाग्रह अभियान हे स्वच्छ भारत अभियानाशी पूर्णपणे जुळले आहे. भारताच्या आगामी पिढ्यांमध्ये स्वच्छतेची एक संस्कृृृृृती निर्माण करणे ही या प्रकल्पाची संकल्पना आहे. स्वच्छाग्रह पूर्णपणे झाल्यानंतर प्रकल्पाचा प्रभाव पाहता येईल.
स्वच्छाग्रह एक महत्वपूर्ण अभियान असून या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. ज्या लोकांमध्ये स्वच्छतेची सवय नाही, अशांच्या सवयीत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामाध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दीड लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
अदानी फाऊंडेशनतर्फे १७ राज्यात स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून ३ हजार ७५ शाळांमध्ये पोहोचविण्यात यश आले आहे. ५७ हजारपेक्षा जास्त स्वच्छाग्रह आणि ३ हजार २०० स्वच्छाग्रह प्रेरक दरमहा १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांपर्यत पोहोचली आहे.
वेस्ट मॅनेजमेंट
अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम चार प्रमुख विषयांवर केंद्रीत आहे. वेस्ट मॅनेजमेंट आणि कचरा, स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि शौचालय या विषयांना घेवून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात जात आहे.

Web Title: Cleanliness of the villagers from cleanliness drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.