शहरातील सार्वजनिक विहिरींची होणार साफ सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:08 PM2019-02-10T21:08:21+5:302019-02-10T21:09:34+5:30

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये,यासाठी नगर परिषदेने शहरातील ५६ सार्वजनिक विहिरींची साफ सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिनदा निविदा काढण्यात आली.

Clearance of public wells in the city will be cleaned | शहरातील सार्वजनिक विहिरींची होणार साफ सफाई

शहरातील सार्वजनिक विहिरींची होणार साफ सफाई

Next
ठळक मुद्देतिनदा निविदा प्रक्रिया : उन्हाळ्याच्या तोंडावर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये,यासाठी नगर परिषदेने शहरातील ५६ सार्वजनिक विहिरींची साफ सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिनदा निविदा काढण्यात आली. अखेर तिसऱ्या निविदेत एका कंत्राददाराने निविदा भरल्याने त्यांना विहिरीची साफ सफाई करण्याचे कंत्राट देण्यात आले.
शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरातील सर्व ग्राहकांकडे नळजोडणी नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. शहरात एकूण ५६ सार्वजनिक विहिरी असून यापैकी बऱ्याच विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. बºयाच विहिरींमधील गाळाचा नियमित उपसा केल्या जात नसल्याने उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरींची नियमित साफ सफाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. त्यामुळेच यंदा नगर परिषदेने उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी शहरातील सार्वजनिक विहिरींची साफ सफाई करण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका कंत्राटदारामार्फत विहिरींची साफ सफाई केली जाणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शहरवासीयांना दिलासा मिळला आहे.

७०० बोअरवेलची होणार दुरूस्ती
शहरातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागू नये यासाठी बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले आहे. शहरात ७०० सार्वजनिक बोअरवेल असून याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. शहरातील बहुतेक बोअरवेल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान यावरुन शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने शहरातील ७०० बोअरवेलची दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढली असून त्यांचे कंत्राट सुध्दा देण्यात आले. त्यामुळे विहिरींच्या साफ सफाई पाठोपाठ बोअरवेलची सुध्दा दुरूस्ती केली जाणार आहे.

Web Title: Clearance of public wells in the city will be cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी