किडंगीपार येथील क्रशर बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:25 PM2019-05-07T22:25:48+5:302019-05-07T22:26:11+5:30

ग्राम किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

Close the crushers at Kidangipar | किडंगीपार येथील क्रशर बंद करा

किडंगीपार येथील क्रशर बंद करा

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुजरुक : ग्राम किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खाजगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. या ठिकाणी सुरुंग लावून दगड फोडले जातात व त्या मोठमोठ्या दगडांना क्रशर मशिनद्वारे बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावली जाते. दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये दगडाचा खूप धूर निघतो व त्यात दगड ही लांब दूरवर फेकले जातात. या दगडाच्या धुरामुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही मशीन रात्रदिवस सुरु राहत असल्याने गावातील लोकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
खानी शेजारील शेतकºयांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले, तरी सुद्धा कंत्राटदार जनप्रतिनिधी तसेच गावकºयंच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे.
तसेच या सुरुंगामुळे निघणाºया दगडाच्या धुरामुळे रस्त्याने जाणाºया लोकांना याचा फटका बसत आहे. यात दगडामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाºया लोकांना धोका निर्माण झाला आहे. क्रशर मशिन व खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील जनता व जवळच्या शेतकºयांचा जीव धोक्यात आला आहे.
या खान जवळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा रस्ता आहे. या रस्त्याची वाहन क्षमता १० ते १२ टनाची असून या रस्त्यावरुन ४० ते ४५ टनाचे ओव्हर लोड टिप्पर गिट्टी वाहून नेत आहेत. यामुळे हा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावर कोल्हापुरी बंधारा व पुल बांधला आहे. या पुलाची वाहन क्षमता कमी असून या पुलावरुन गिट्टीचे टिप्पर जात असल्याने हा लोकांच्या जाण्या-येण्याचा पुल केव्हाही तुटू शकतो यात दुमत नाही.
अर्जुनी-किडंगीपार रस्त्यावरुन लोकांना जाण्या-येण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार व सुचना करण्यात आल्या. परंतु या अधिकाºयांचे याकडे मुळीच लक्ष नाही. उलट गिट्टी खोदकाम व क्रशर कंत्राटदाराला यांचे अभयदान असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा
या क्रशरमुळे शासकीय संपत्तीचे नुकसान होऊ नये व गावातील नागरिकांचे आरोग्य तसेच जिवीत हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दयावे व क्रशर मशीन तसेच सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले तसेच गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. काम बंद न केल्यास जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Close the crushers at Kidangipar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.