पठाणटोला येथील क्रशर बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 10:16 PM2018-12-06T22:16:05+5:302018-12-06T22:18:05+5:30
गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा-तेढा : गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे. यावर गावकरी व प्राथमिक शाळेकडून हे क्रशर बंद करण्याची मागणी केली जात असून पालकमंत्र्यांसह अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
हे स्टोन क्रशर राकेश ईश्वरदास अग्रवाल (रा.गोंदिया) यांच्य मालकीचे असून गावापासून फक्त २०० मीटर अंतरावर आहे. क्रशर रात्रंदिवस सुरू राहत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात आवाज व धूर येतो. आवाजामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड झाले आहे. शिवाय जे विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणाला जातात त्यांना रात्री अभ्यास करणे कठीण झाले आहे. तर धुरामुळे गावातील लोकांचे जिवन जगणे असहनिय झाले आहे.
क्रशर गावातील तळे व शेतीला लागून असल्यामुळे तळ््यातील पाण्यावर धूळ साचत असून पाणी दुषीत होत आहे. अशात तळ््यातील पाणी प्राशन केल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतात धूळ जात असल्याने धुराचे थर तयार होऊन शेती दिवसेंदिवस नापिक होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. या क्रशरची जागा ०.५० हेआर आहे. माज्ञ क्रशर मालल क्रशरसाठी लागणारा कच्चा व पक्का माल वन विभागाच्या सुमारे ०.८० हेआर जागेत ठेवत आहे. असे असतानाही वन विभागाकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे. यात मात्र गावकऱ्यांना गुरे चारण्यास अडचण होत आहे. त्याचप्रकारे तळ््यातील अधिकचे पाणी निघण्याच्या जागेवर क्रशर मालकाने अतिक्रमण केल्यामुळे ते पाणी आता शेतातून जात असून त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. क्रशरमधील जड वाहनांमुळे गावातील रस्त्यांची दुर्गत झाली आहे. त्यातही क्रशर मालक रॉयल्टी पेक्षा जास्त खनिजाची विक्री करीत असल्याचे समजते. त्यामुळे हे क्रशर बंद करावे अशी मागणी गावकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.
अन्यथा अधिकारीच राहतील जबाबदार
क्रशर बंद करून गावकऱ्यांच्या जिवनाशी खेळणे थांबविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, तहसीलदार, खनिकर्म विभाग व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, क्रशर बंद न केल्यास भविष्यात होणाऱ्या हानिला मंजुरी देणारे अधिकारीच जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.