ड्रोनव्दारे गोंदिया रेल्वेस्थानकावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:41+5:30
गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण करतांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते. गोंदिया रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्या येतांनाही त्याचे चित्रीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकावर विमानतळासारखी कडक सुरक्षा देण्यासाठी २९ व ३० सप्टेंबरला ड्रोनच्या माध्यामातून गोंदिया रेल्वे स्थानकाची सुरक्षेची पाहणी करण्यात आली. यासाठी नागपूरवरून ड्रोनसह एका चमूला पाचारण करण्यात आले होते.
गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण करतांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते. गोंदिया रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्या येतांनाही त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचा आढावा घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने वर्षातून दोन वेळा चित्रीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
इतवारी-भंडारा रोड रेल्वेस्थानकाचे यापूर्वीच ड्रोनच्या माध्यामातून चित्रीकरण करण्यात आले. गोंदिया व्यतिरिक्त डोंगरगडचेही ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. ही व्हिडीओग्राफी केल्यानंतर ती व्हिडीओ रेल्वे बोर्डला पाठविले जाते.सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हे चित्रीकरण करण्यात येते. गर्दीमुळे सुरक्षा ठेवली जावी यासाठी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येते.
विमानतळासारख्या सुरक्षेसाठी पाऊल
२९ सप्टेंबरपासून गोंदिया रेल्वेस्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेला घेऊन रेल्वेस्थानकाच्या रेलटोली परिसरातील पादचारी पूल सुरू आहे. तर बाजार परिसरातील पादचारी पूल सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. बाजार परिसरातील प्रवाश्यांसाठी रेल्वेस्थानकाचा मुख्यद्वार ये-जा करण्यासाठी खुले आहे. कुडवा लाईन परिसरातील रेल्वे पुलावरून प्रवाश्यांना बाहेर निघण्याची सुविधा आहे. परंतु आत येण्यासाठी सदर पुलाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले आहे. या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी नागपूरवरून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने केली. या रेल्वेस्थानकाला विमानतळासारखी सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.