मोबाईल टॉवरचे काम त्वरित बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 01:47 AM2016-06-25T01:47:19+5:302016-06-25T01:47:19+5:30

स्थानिक संत सज्जन वॉर्डात रेल्वे गेट समोरील तहसील कार्यालय रस्त्याच्या कडेला मोबाईल टॉवरचे जोरात काम सुरू आहे

Close the mobile towers immediately | मोबाईल टॉवरचे काम त्वरित बंद करा

मोबाईल टॉवरचे काम त्वरित बंद करा

Next

संत सज्जन वॉर्ड : नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन
तिरोडा : स्थानिक संत सज्जन वॉर्डात रेल्वे गेट समोरील तहसील कार्यालय रस्त्याच्या कडेला मोबाईल टॉवरचे जोरात काम सुरू आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी या टॉवरला विरोध केला. टॉवर येथे बनल्यास आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्याला बनू देऊ नये, परवानगी देण्यात येऊ नये, याबाबत ७ फेब्रुवारी २०१६ ला नगर परिषद तिरोडा येथे निवेदन देण्यात आले. त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. काम सुरू आहे. सदर काम तात्काळ बंद करावे, यासाठी संत सज्जन वॉर्डातील नागरिकांनी न.प. च्या सभागृहात प्रत्यक्ष जाऊन नगराध्यक्ष अजय गौर यांना निवेदन दिले.
निवेदन घेऊन येणारा जनसमुदाय बघून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ बोलावून घेवून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. निवेदन स्वीकारून मोबाईल टॉवर बनणार नाही, त्यासाठी योग्य कार्यवाही केली जाईल, असे निवेदन देणाऱ्या नागरिकांना आश्वासन दिले. तर अधिकारी व कर्मचारी यांना आताच पत्र तयार करा व संबंधितांना द्या तसेच पोलिसांनाही कळवा. त्यांच्या मदतीने कार्यवाही करावे, असे आदेश दिले.
निवेदन देणाऱ्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने सुखदेवे उपवंशी, अरविंद क्षीरसागर, संजय चौधरी, लेखचंद रामटेके, विनोद साखरे, झगडू ढबाले, रमेश मडावी, तक्षक जिंदे, आनंद मरस्कोल्हे, किरण खोब्रागडे, मोहनलाल गौतम, नरेश गजभिये, माणिक डोळस, पुरूषोत्तम बोपचे, महेंद्र क्षीरसागर, विश्वजित चव्हाण, चिंकू ठाकूर, नवीन गुप्ता, अक्षय अंबादे, सचिन बन्सोड, राजेंद्र मेश्राम, कमल चौधरी, अभय चौरे, कल्पना वालदे, मंदा मडावी, दुर्गा डोळस, अंतकला डोळस, अर्चना रामटेके, मंदिरा साखरे, निर्मला बोपचे, तारा ढबाले, माया कटरे, मुन्नी डोळस, काजल पवार, अंजिरा चौरे तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Close the mobile towers immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.