बनावट कागदपत्र प्रकरणी कोठडी
By admin | Published: September 21, 2016 12:51 AM2016-09-21T00:51:54+5:302016-09-21T00:53:37+5:30
बनावट कागदपत्र प्रकरणी कोठडी
निंबा (तेढा) : तालुका कृषी अधिकारी गोरेगाव व मंडळ कृषी अधिकारी चोपा यांच्या वतीने संपूर्ण गोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये धान पिकावर होणाऱ्या किडी व रोगांवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथील हलबीटोला येथे धान पिकावर होणाऱ्या रोग व किडींवर त्यांच्या लक्षणानुसार कोणत्या औषधींचा वापर करावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माजी सरपंच सावलराम ताराम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विवेक मेंढे, कृषीमित्र रमेश ताराम, मार्गदर्शक एम.एस. मेळे, मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मार्गदर्शक एम.एस. मेळे यांनी धानपिकावर होणाऱ्या खोडकिडा, गादमासी, लष्करी अळी, तपकिरी तुडतुडे, करपा व कडाकरपा यांची लागण कशी होते, त्यांची लक्षणे कशी ओळखावीत, त्यांच्यावर कोणत्या औषधांची फवारणी करुन नियंत्रण कसे करावे व त्या औषधांचे प्रमाण किती असावे यावर माहिती दिली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि इतर कृषीविषयक योजनांची तसेच जैविक नियंत्रणाकरिता धानपीक लागवडीच्या बांधीत किमान ४ ते ५ पक्षीथांबे पक्ष्यांना बसण्यास लावावे, यामुळे किडीला नियंत्रणात आणता येते व प्रदुषणावर आळा घालता येते, यावर मार्गदर्शन केले. संचालन व आभार कृषी सहायक एल.एल. नागोसे यांनी केले. (वार्ताहर)