मजुरांचा तहसील कार्यालयाला घेराव

By Admin | Published: May 14, 2017 12:21 AM2017-05-14T00:21:55+5:302017-05-14T00:21:55+5:30

ग्राम पंचायत किकरीपार येथील रोहयोच्या कामात रोजगार सेवकाकडून अनियमता होत असल्याने मजुरांनी तहसील कार्यालयाचा घेराव करून

Co-ordination of the Labor's Tahsil office | मजुरांचा तहसील कार्यालयाला घेराव

मजुरांचा तहसील कार्यालयाला घेराव

googlenewsNext

ग्रा.पं.किकरीपार : रोजगार सेवकाकडून कामात कसूर
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : ग्राम पंचायत किकरीपार येथील रोहयोच्या कामात रोजगार सेवकाकडून अनियमता होत असल्याने मजुरांनी तहसील कार्यालयाचा घेराव करून रोजगार सेवकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
आमगाव तालुक्यातील किकरीपार ग्रा.पं.अंतर्गत रोहयोचे कामे सुरु आहेत. गावात पाण्याचा साठा उपलब्ध राहावा आणि गावातील मजूर वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टीने कालव्याची सफाई करण्यासाठी १३ मे रोजी गावकरी कामाच्या ठिकाणी पोहचले तेव्हा काम बंद असल्याचे कळले. रोजगार सेवकाला विचारल्यावर मस्टर काढण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने किकरीपार येथील १३ मे करीता कामाकरीता मजूरी मिळाली नाही. तशी सूचना एक दिवसाअगोदर रोजगार सेवक तेजराम मेंढे यांनी मजुरांना दिली नाही. त्यामुळे आजच्या रोजीचे काय? असा प्रश्न मजुरांना पडला.कामाच्या ठिकाणी छावणी सुध्दा लावण्यात आली नाही, त्यामुळे सत्या असलेल्या प्रखर उन्हात विश्रांतीसाठी लावणीची गरज आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी प्रथमोपचार पेढी अस्तीत्वात नाही. उन्हाच्या तडाख्यात अनेक महिला मजूर भोवळ येऊ पडतात. पण रोजगार सेवकांनी या मुलभूत साधनांची पुर्तता केली नाही.
काही दिवसापूर्वी येथील महिला मजूर माधुरी माधोराव मेश्राम यांची अचानक प्रकृती बिघडली व तेव्हा प्रथमोपचार न देता ग्रामीण रुग्णालयात हलविण्याची पाळी आली.
शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात मजुरांसाठी व महिलेसाठी अनेक मुलभूत गरजेची तरतूद केली. पण संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी, छावणी, प्रथमोपचार इतर साधना दिसून येत नाही. याकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष होत आहे. याकरीता जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील कामांचे निरीक्षण करावे अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.
किकरीपार येथील कामावरील मजुरांची मजूरी समाधानकारक निघत नसल्याने रोजगार सेवक तेजराम मेेंढे व अभियंता अनिल शिवणकर, यांच्यावर रोष व्यक्त केला. रोहयोच्या कामात हप्त्यात कामाची मोजणी करण्यात यावी, अश्या सूचना नायब तहसीलदार राजेश वाकचौरे यांनी दिली. सदर कार्याला मजुरांकडून पैसे घेऊन आपल्या मर्जीतले मजूर कामावर घेणे, मजूरीत वाढ करणे असे प्रकार रोजगार सेवकांकडून होत असल्याचे बाबू मेंढे यांनी सांगितले.
शासकीय कामाच्या उद्दिष्टपूर्तीकरीता आणि मजुरांच्या कुटुंबाला रोजगार मिळावे या धोरणातून गावात कामे सुरु असतांना तिव्र उन्हात मजूर वर्गावर अन्याय होत आहे. याकरीता जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरेश बिसेन, सुखचंद बिसेन, तिलकचंद सोनवाने, बाबू मेंढे, मानिक बिसेन, सुभाष सोनवाने, परसराम नेवारे, रामचंद सोनवाने, रमेश भिमटे, मुलचंद राऊत, दुर्गेश गौतम, राजाराम सोनवाने, पाडुरंग सोनवाने, दुलन बिसेन, सरिता सोनवाने, प्रमिला चौधरी, सविता बिसेन, दुर्गेश्वरी बिसेन, ललिता बिसेन, जानेश्वरी बिसेन, द्वारका सोनवाने, आशा बिसेन, उर्मिला बंसोड व शेकडो महिलांनी केली आहे.

रोहयोच्या कार्यात रोजगार सेवक कसूर ठेवत असल्याचे मजुर वर्गानी लेखी निवेदन दिले आहे. त्यात कामावर मुलभूत साधणे असायलाच हवी ते सेवकाकडून होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. मस्टर तयार नसल्यास काम बंद असल्याची सुचना मजुरांना रोजगार सेवकांनी दिली नाही. याकरीता सरपंच व सचिवांनी तत्काळ कारवाईसाठी सभा घ्यावी अशी सूचना देण्यात येईल. आपल्या कार्यालयात दोनच आॅपरेटर असल्याने संपूर्ण तालुक्याचे मस्टर तयार करणे त्यांची जवाबदारी आहे. त्यामुळे मस्टर वेळेवर तयार करण्यास विलंब होत आहे. मजुरांना न्याय मिळाव याकरीता प्रशासन प्रत्यक्ष कामांची पाहणी करीत आहे.
आर.जे.वाकचौरे,
नायब तहसीलदार, आमगाव

Web Title: Co-ordination of the Labor's Tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.