कोच पोजीशनच्या टिष्ट्वटची रेल्वेमंत्र्यांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:19 PM2018-08-18T23:19:55+5:302018-08-18T23:21:13+5:30
येथील रेल्वे स्थानकावरील डिस्प्ले बरेदा बंद तर कधी चुकीचा कोच क्रमांक दाखविला जातो. त्यामुळे याचा ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी (दि.१७) येथील रेल्वे स्थानकावर अजमेरी पुरी (१२८४१) या गाडीचे कोच क्रमांक व डिस्प्ले क्रमांक चुकीचे दाखविण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावरील डिस्प्ले बरेदा बंद तर कधी चुकीचा कोच क्रमांक दाखविला जातो. त्यामुळे याचा ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी (दि.१७) येथील रेल्वे स्थानकावर अजमेरी पुरी (१२८४१) या गाडीचे कोच क्रमांक व डिस्प्ले क्रमांक चुकीचे दाखविण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ उडाली. दरम्यान गोंदिया येथील प्रवासी पीयूष अग्रवाल यांनी या प्रकाराची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना टिष्ट्वट करून तक्रार केली. त्यांनी लगेच याची दखल दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे विभागाचे डीआरएम बंडोपाध्याय यांना दखल घेण्यास सांगितले.
काही लोक सोशल मिडियाचा योग उपयोग करुन घेत असून त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यां देखील वेळीच मार्गी लागत असल्याने सोशल मिडिया त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे रेल्वेसह इतर शासकीय विभागांनी त्यांच्या विभागाशीे निगडीत तक्रारी व त्यांचा फिडबॅक त्यांच्या आॅनलाईन संकेतस्थळावर अथवा टिष्ट्वटर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा प्रवाशांना सुद्धा फायदा होत आहे. शुक्रवारी (दि.१७) गोंदिया रेल्वे स्थानकावरुन अजमेरी पुरी या गाडीने प्रवासाठी जाणारे येथील पीयूष अग्रवाल हे आपल्या कुटुंबीयांसह रेल्वे स्थानकावर उभे होते. गाडी येण्याच्या दहा ते पंधरा मिनिटापूर्वी डिस्प्लेमध्ये कोच क्रमांक दाखविण्यात आले.
त्यानुसार प्रवाशी त्या ठिकाणी जावून उभे राहिले. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांचा समावेश होता. मात्र गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाटावर सदर गाडी पोहोचल्यानंतर डिस्प्लेनुसार कोच लागले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऐनवेळी सामान घेवून धावपळ करावी लागली. सर्वाधिक मनस्ताप ज्येष्ठ नागरिक व महिलांना सहन करावा लागला. त्यामुळे यासर्व प्रकाराची तक्रार व फोटो पीयुष अग्रवाल यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना टिष्ट्वटर टिष्ट्वट करुन केली. दरम्यान या टिष्ट्वटरवरील तक्रारीची रेल्वे मंत्री गोयल यांनी लगेच दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांना टिष्ट्वट करून लगेच दखल घेण्यास सांगितले. बंडोपाध्याय यांनी सुध्दा टिष्ट्वटरवर दखल घेऊन योग्य कारवाही करण्याचे आश्वासन दिले.
बरेचदा डिस्प्लेच नाही
हावडा-मुंबई मार्गावरील सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. दिवसभरात या रेल्वे स्थानकावरुन जळपास दीडशेहून अधिक रेल्वे गाड्या धावतात. विशेष म्हणजे हे रेल्वे स्थानक अ श्रेणीत आहे. मात्र रेल्वे स्थानकावरील सोईसुविधांकडे येथील रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. बरेचदा गाड्या आल्यानंतरही डिस्प्ले होत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.