कोरोनाच्या दहशतीत आता झिका व्हायरसचा गोंध‌ळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:13+5:302021-07-18T04:21:13+5:30

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने अवघ्या जगभराला हादरवून सोडले आहे. दुसऱ्या लाटेची दहशत आजही कायम असतानाच त्यात झिका ...

Coca-Cola's terror now confuses the Zika virus | कोरोनाच्या दहशतीत आता झिका व्हायरसचा गोंध‌ळ

कोरोनाच्या दहशतीत आता झिका व्हायरसचा गोंध‌ळ

Next

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने अवघ्या जगभराला हादरवून सोडले आहे. दुसऱ्या लाटेची दहशत आजही कायम असतानाच त्यात झिका व्हायरसने आता भर घातली आहे. यामुळे आता नागरिकांची चांगलीच फसगत झाली आहे. झिका व्हायरस हा डासांपासून पसरणारा व्हायरस असून डेंग्यू सारखीच झिकाच्या लागणाची लक्षणे आहेत. मात्र यावर अद्याप कोणतेच औषध वा लस उपलब्ध नसल्याने डांसापासून आपली सुरक्षा करणे गरजेचे आहे. शिवाय झिकाची चाचणी जिल्हास्तरावर होत नसून शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून पुणे येथील लॅबमध्ये नमूने पाठविले जातात.

--------------------------------

कशामुळे होतो?

झिका व्हायरसची लागण इडीस डासामुळे होत असून या डासामुळेच डेंग्यू व चिकनगुनिया होतो. त्यामुळे झिका हा सुद्धा डासजन्य आजार असून याला डास कारणीभूत आहेत. मात्र यावर सध्या कोणतेच औषध वा लस उपलब्ध नाही. त्यामुळे डांसापासून सुरक्षा करणे गरजेचे आहे.

-----------------------

झिका व्हायरसची लक्षणे काय

- झिका व्हायरसची लागण झाल्यास ताप येतो.

- हात-पाय दुखतात व त्यातही जोड दुखण्याचा त्रास होतो.

- डोळे लाल होतात.

- डोळे दुखण्याचाही त्रास होत असून डेंग्यू सारखीचा याची लक्षणे आहेत.

------------------------

उपाययोजना काय?

झिका व्हायरसची लागण एकप्रकारे डेंग्यू सारखीच असून यामध्ये डेंग्यूसाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना म्हणजेच, पाणी साठू देऊ नये, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाणी साठत असलेल्या जागांची नियमित सफाई करावी आदि करावे. याशिवाय आरोग्य विभागाकडून फवारणीचे काम सुरू आहे. शिवाय, कंटेनर सर्वे सुरू असून घरोघरी जाऊन पाहणी केली जात आहे. पाणी साठलेल्या जागांमध्ये टेमीफॉस नामक औषध टाकले जात आहे.

---------------------------

कोट

डासांपासूनच झिकाची लागण होत असल्याने यासाठी डासांपासून बचाव करणे गरजेचे आहे. करिता मच्छरदानीतच झोपावे, पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने पाणी साठू देऊ नये. शिवाय कोणतीही लक्षण असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- डॉ.नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

(बॉक्स. तिन्ही बॉक्स जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून करावेत)

४) आरोग्य अधिकाऱ्याचा कोट

Web Title: Coca-Cola's terror now confuses the Zika virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.