लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:38+5:302021-04-05T04:25:38+5:30
बाराभाटी : कोरोनाची लस घेताना कुणीही घाबरु नये. हे लसीकरण आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठीच आहे. या लसीकरण मोहिमेचा ...
बाराभाटी : कोरोनाची लस घेताना कुणीही घाबरु नये. हे लसीकरण आपल्या जीवाची रक्षा करण्यासाठीच आहे. या लसीकरण मोहिमेचा प्रत्येक नागरिकाने लाभ घेऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबर मडावी यांनी केले.
येथील आयुर्वेदिक दवाखाना आणि कुंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नियमितरित्या लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत येथील ४० लोकांनी व गोठणगाव येथील ८० लोकांनी लसीकरण करवून घेतले आहे. लसीकरणाचा आरोग्यासाठी फायदाच आहे. आपला कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी लसीकरण आवश्यक आहे. शासनाच्या सूचना पाळा व मास्क लावा, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. लसीकरणासाठी गौरव टेंभेकर, आरोग्यसेवक राजेंद्र वघारे, आरोग्यसेविका साखरे, राऊत व परिचर चेतना रामटेके आदी सहकार्य करीत आहेत.