गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 01:25 AM2017-06-12T01:25:09+5:302017-06-12T01:25:09+5:30

घरातील अठराविश्वे दारिद्रय असताना झालेल्या आजारावर उपचार करण्याची हिंमतही होत नव्हती.

The collection of uterine cancer was collected | गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा काढला

गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा काढला

Next

गंगाबाईत यशस्वी शस्त्रक्रिया: राजीव गांधी जीवनदायी योजनेतून खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरातील अठराविश्वे दारिद्रय असताना झालेल्या आजारावर उपचार करण्याची हिंमतही होत नव्हती. सर्व ईश्वरावर सोडणाऱ्या त्या महिलेला सरपंचाने केलेल्या मार्गदर्शनामुळे ती बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. या ठिकाणी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून शुक्रवारी (दि.९) तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून साडे सहा किलो वजनाचा गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा तिच्या पोटातून काढला.
वसंतीका प्रमेंद्र बिंझारे (५०,रा.आसोली) असे रूग्ण महिलेचे नाव आहे. मागील तीन-चार वर्षापासून तिच्या पोटात गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा होता. घरची परिस्थीती नाजूक, अंगावर चार मुलीच्या संगोपनाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना काही सूचत नव्हते. परंतु गावातील सरपंचाने त्यांना बाई गंगाबाई रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
वसंतीका यांनी बाई गंगाबाई रूग्णालय गाठून तेथील राजीव गांधी जीवनदायी योजना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी वसंतीकाला सहकार्य करून त्यांची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना ४ ग्रॅम रक्त होते. त्यांना सुरूवातीला ४ बॉटल रक्त चढविण्यात आले.
शस्त्रक्रियेदरम्यान दोन बॉटल रक्त चढविण्यात आले. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग तज्ज्ञ विभागातील प्राध्यापक डॉ. चांदणी बग्गा यांनी डॉ.सायास केंद्र यांच्या मदतीने सदर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या पोटातून साडे सहा किलोचा गर्भाशयाच्या कर्करोगाचा गोळा काढण्यात आला.

Web Title: The collection of uterine cancer was collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.