सामूहिक विवाह सोहळा म्हणजे मजबूत समाजाचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 08:59 PM2019-04-19T20:59:02+5:302019-04-19T20:59:46+5:30
सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील ग्राम साकरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, समिती सामूहिक विवाह सोहळ््याचे यशस्वी आयोजन करीत असून क्षेत्रात एका नव्या परंपरेला सुरूवात केली आहे. आज कित्येक संघटनांकडून सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन केले जात आहे. मात्र या गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली आहे. सामूहिक विवाह युगलांना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजही एकत्रीत होवून एका मंचावर असल्याचे मत ही व्यक्त केले.
विवाह सोहळ्याला माजी मंत्री भरत बहेकार, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार रामरतन राऊत, कॉँग्रेस कमिटी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, सुखराम फुंडे, उषा शहारे, सुनंदा बहेकार, जियालाल पंधरे, टोलसिंग पवार, संगीता कुसराम, दिलीप वाघमारे, हिरालाल फाफनवाडे, श्रावण राणा, देवराज वडगाये, संपत सोनी, नटवरलाल गांधी, विजय बहेकार, प्रमोद येटरे, लिलाधर पाथोडे, संगीता शहारे, समिती अध्यक्ष देवराम चुटे, उपाध्यक्ष अरविंद फुंडे, नामदेव दोनोडे, रामदास हत्तीमारे, पृथ्वीराज शिवणकर, पुरूषोत्तम कोरे, योगेश बहेकार, संतोष बोहरे, प्रकाश दोनोडे, संजय बागडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आठ जोडप्यांचे शुभमंगल
साकरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने मागील १६ वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जात आहे. यांतर्गत आतापर्यंत शेकडो जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. त्याचप्रकारे यंदा आठ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ या सामूहिक विवाह सोहळ््यात पाहुणे व समाजबांधवांच्या उपस्थितीत लावण्यात आले.