जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराला टाळे
By admin | Published: June 7, 2017 12:08 AM2017-06-07T00:08:24+5:302017-06-07T00:08:24+5:30
जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराला टाळे
जलयुक्त शिवारची नवीन कामे सुरू : पाण्याच्या पातळीत वाढ
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०१९ पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या तिसऱ्या टप्यात दोन हजार १८६ कामांवर ८७ कोटी ४६ लाख ९९ हजार रूपये खर्च केले जाणार आहेत. जिल्ह्यात सन २०१६-१७ (दुसऱ्या टप्यातील) काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पुर्ण केले जाणार आहेत.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात (सन २०१६) मध्ये ९४ गावांची निवड करण्यात आली होती. या गावातील चांगली स्थिती पुढे आली आहे. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल झाली आहेत. दुसऱ्या टप्यात (सन २०१६-१७) मध्ये ७७ गावांची निवड करण्यात आली. तर तिसऱ्या टप्यात (सन २०१७-१८) मध्ये ६३ गांवांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे जलद गतीने सुरू आहेत. सन २०१६-१७ चे उद्दीष्ट पुर्ण होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील ७७ गावात कामे सुरू आहेत. दोन हजार ४४१ कामांपैकी दोन हजार ११ कामे पुर्ण झाली आहेत. यात कृषी विभागाची एक हजार ४१९, जि.प.लघु पाटबंधारे विभागाची ५४, पंचायत समिती १३९, जलसंधारण १२ व वन विभागची ३८७ कामे पुर्ण झाली आहे. तर कृषी विभागाची १६९, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.) १०७, पंचायत समिती १४, जलसंधारणाची ५ तसेच वन विभागाची १३५ कामे जलद गतीने सुरू आहेत. ही सर्व कामे जून अखेरपर्यंत पुर्ण होणार. गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील १०-१०, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव प्रत्येकी सात, आमगाव व सडक अर्जुनीच्या प्रत्येकी सहा गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.) व पंचायत समिती ला २७८ काम मंजूर करण्यात आले होते.
या कामांवर १४ कोटी १५ लाख ३२ हजार रूपये खर्च करण्यात आले. नवीन प्रस्तावित एक हजार ३९९ कामांवर ५१ कोटी ७६ लाख २३ हजार रूपये खर्च करण्याचे उद्दीष्ट आहे. नवीन प्रस्तावित कामांमध्ये कृषी विभागाच्या ९३८, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.), जलसंधारण ४७, वन विभागाचे २३४ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १६० कामांचा समावेश आहे.
दुरूस्तीच्या ५०९ कामांसाठी २१.५५ कोटी
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरूस्तीची ५०९ कामे करण्यात येणार आहेत. या कामांवर २१ कोटी ५५ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहे. यात कृषी विभागाच्या ३२० कामांवर तीन कोटी सहा हजार, लघु पाटबंधारे विभागाच्या (जि.प.) १५३ कामांवर १६ कोटी २७ लाख ६७ हजार तर वन विभागाच्या ३६ कामांवर दोन कोेटी २७ लाख ७१ हजार खर्च करण्यात येतील.