महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नॅक समितीनुसार सुविधा द्याव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:30+5:302021-01-19T04:30:30+5:30
आमगाव : ग्रामीण परिसरातील विनाअनुदानित पदवी महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. संचालकांनी नॅक ...
आमगाव : ग्रामीण परिसरातील विनाअनुदानित पदवी महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. संचालकांनी नॅक समितीनुसार सुविधा द्याव्या, तसेच महाविद्यालयांना अनुदान मिळावे, याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. अभिजीत वंजारी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड.एन.डी.किरसान, अभिजीत वंजारी मित्र परिवारचे संयोजक राजेश गोयल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जमील खान उपस्थित होते. आ.वंजारी म्हणाले, पेन्शन योजना लागू करण्यासाठी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच ग्रामीण भागातील शाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार, क्रीडा संकुल उभारण्यासाठी व वाचनालयांना अनुदान मिळेल, याकरिता पाठपुरावा करण्याचे एवढेच नव्हे, तर आमदार निधीतून माझे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे सांगितले.