दुष्काळी परिस्थितीतही रंगोत्सवाला उधान

By admin | Published: March 26, 2016 01:37 AM2016-03-26T01:37:36+5:302016-03-26T01:37:36+5:30

यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी आणि कीडीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही होळी आणि रंगोत्सवातील उत्साह कायम होता.

Colorful rush in drought conditions | दुष्काळी परिस्थितीतही रंगोत्सवाला उधान

दुष्काळी परिस्थितीतही रंगोत्सवाला उधान

Next

शहरी भागात उधळण : ग्रामीण भागात जपले सामाजिक भान, पर्यावरणपूरक होळीला प्राधान्य
गोंदिया : यावर्षी जिल्ह्यात पावसाअभावी आणि कीडीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही होळी आणि रंगोत्सवातील उत्साह कायम होता. मात्र ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी सामाजिक भान ठेवत पर्यावरणपूरक होळीला प्राधान्य दिले. शहरी भागात मात्र होळीत मोठमोठी लाकडं जाळण्यापासून तर रंगोत्सवात पाण्याची उधळण करण्यापर्यंत कोणत्याच बाबतीत सामाजिक भान जपण्यात आले नसल्याचे चित्र दिसून आले.
ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती असतानाही रंगोत्सव साजरा करण्यात आला. मात्र अनेक भागात पाण्याची उधळपट्टी कमी झाल्याचे दिसून आले. शहरी भागात दुष्काळी परिस्थितीशी जणूकाही आपला काहीच संबंध नाही, अशा अविर्भावात नागरिकांनी हा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे युवा वर्गासह बच्चेकंपनी आणि महिलांनीही रंगांसोबत पाण्याची होळी खेळून आनंद लुटला.
पर्यावरणपूरक होळी
सोनपुरी : सालेकसा तालुक्यात गोंदिया वन विभाग गोंदिया आणि ग्रामीण जनतेच्या सहकार्याने पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात आली. वनरक्षक एफ.सी. शेंडे, पर्यावरण मित्र कहाली शाळेचे शिक्षक राजकुमार बसोने यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात विविध ठिकाणी श्रमदानातून घनकचरा, प्लास्टिक पिशव्या गोळा करुन पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाने परिसरातील घनकचरा व जंगलाची साफसफाई झाली. आमगाव खुर्द येथे मोक्षधाम घाटावर महिलांनी श्रमदानातून पर्यावरणपुरक होळी साजरी केली.
कालव्यातील
कचऱ्याची होळी
आमगाव/कालीमाटी : बनगाव येथील अनिहा नगरात कालव्यातील केरकचरा काढून त्याची होळी करण्यात आली. लघु कालव्यात अनेक वर्षापासून कचऱ्याचे साम्राज्य आहे. येथील नागरिकांनी व युवकांनी आधीच कालव्याची सफाई केली. त्यानंतर २३ मार्च रोजी सदर केरकचऱ्याचे होळी जाळून विल्हेवाट लावण्यात आली. समाजसेवक बुधराम हत्तीमारे, योगेश बनोठे, मोनेश बनोठे, उमेश रहिले, निखील राधेशाम टेंभरे आदींनी कालव्याची सफाई करण्यासाठी पुढाकार घेतला.
होळी दहनावेळी जि.प. सदस्य सुखराम फुंडे, से.नि. प्राचार्य एच.के. फुंडे, राजकुमार अग्रवाल, कृष्णा पटले, राधेशाम टेंभरे, पांडुरंग रहिले, वासुदेव बावणकर, संजय गुप्ता, गणेश येळे, अभियंता जि.बी. बनोठे, हिरेंद्रकुमार बनोठे, अरविंद बनोठे, केश्व ढोलवार, मनिषा रहिले, विक्की ठाकूर, श्रावण शिवणकर, कृउबास सतिष आकांत, राजीव फुंडे, अप्पु बळपय्या आदी उपस्थित होते.
वनविभाग व समितीचा पुढाकार
बोंडगावदेवी : स्थानिक सहवनक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या तिडका येथे पर्यावरणपुरक होळीचे दहन वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, क्षेत्र सहायक धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव, संयुक्त वनव्यवस्थापन समिती तिडका तसेच क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिडका येथे आयोजित कार्यक्रमाला वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, बोंडगावदेवी क्षेत्राचे सहाय्यक धुर्वे, वनरक्षक शिशुपाल पंधरे, पी.टी. दहीवले, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक लंजे, सरपंच आनंदराव मेश्राम, उपसरपंच शिवदास शहारे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. जंगलातील लाकडांचा वापर न करता घनकचरा, प्रदुषित प्लास्टिक, गवत आदींच्या मिश्रणाने होळी तयार करून होळीचे दहण करण्यात आले. संचालन क्षेत्र सहाय्यक धुर्वे यांनी केले तर आभार वनरक्षक शिशुपाल पंधरे यांनी मानले.
कोरड्या होळीचा रंगफुलोत्सव
बाराभाटी : ग्रामीण भागामध्ये यंदा पाण्याविना कोरडी होळी खेळण्यात आली. पाण्याऐवजी यावर्षी फक्त रंग-गुलाल, तर काही ठिकाणी फुलांची उधळण करुन कोरडी होळी साजरी करण्यात आली. यंदा रंगपंचमीला सर्वात जास्त पळस फुलांना बहर आला. त्या फुलांच्या रंग तयार करणाऱ्या मुलांना यावर्षी गुलाल आणि पळस फुले उधळून होळी साजरी केली. पूर्वीसारखं होळीला डफडीच्या तालावर नाचणे, एकमेकांना हार-गाठी देणे हे सर्व कमी प्रमाणात दिसले. धुळवळ झाली पण ती सुद्धा ४० टक्के दिसली. पूर्वी शिमग्याची बोंब २ दिवस असायची, पण यावर्षी तर एक दिवस सुद्धा बोंब झाली नाही. होळीची परंपरा आता बरीच कमी झाल्याचे या भागात दिसून आले. दिवसभर चालणारी रंगपंचमी आता २-३ तासात गुंडाळल्या गेल्याचे दिसले. ग्रामीण भागात ‘पाणी वाचवा, माणूस जगवा’ या संदेशासह सामाजिक भान जपल्या जात असल्याचे दिसून आले.

Web Title: Colorful rush in drought conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.