समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करा

By admin | Published: January 18, 2017 01:30 AM2017-01-18T01:30:32+5:302017-01-18T01:30:32+5:30

मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजुनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय,

Combine each component in the community | समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करा

समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करा

Next

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : साखरीटोला येथे कुणबी समाज अधिवेशन
साखरीटोला : मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजुनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाहीत. आपले अधिकार जाणून घेऊन जे एका व्यक्तिला महत्व नसते ते संघटनेला महत्व असते. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करण्याची गरज असल्याचे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी काढले.
युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोला (सातगाव) तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोल्याच्या पटांगणावर आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक बनगाव जि.प. सदस्य सुखराम फुंडे, अतिथी म्हणून जि.प. सदस्य लता दोनोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) बागडे, विजय बहेकार, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, वनक्षेत्राधिकारी एल.एस. भुते, काशिराम हुकरे, माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे व अन्य अतिथी मंचावर उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सविता बेदरकर म्हणाल्या, समाज हितासाठी सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. संघटनेशिवाय समाजाला महत्व नाही असे सांगत सर्वच क्षेत्रात कुणबी समाजाने पाय रोवण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी विजय बहेकार, लता दोनोडे, सुखराम फुंडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी उपवर-वधू परिचय मेळावा, हळदी-कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे यांनी केले. आभार डॉ. संजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा कुणबी समाज सेवा स्थायी समितीचे अध्यक्ष भुमेश्वर मेंढे, सचिव कमलबापू बहेकार, प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, युवराम कोरे, युवा कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष देवराम चुटे, पृथ्वीराज शिवणकर, संतोष बोहरे, रामदास हत्तीमारे, नामदेव दोनोडे, प्रकाश दोनोडे, अरविंद फुंडे, संजय बागडे, शैलेष मेंढे, निलकंठ दोनोडे, प्रेमलाल ठाकरे, राजू काळे, श्यामलाल दोनोडे, मनोज चुटे, डॉ. संजय देशमुख, डॉ. हेमंत फुंडे, संजय दोनोडे, डॉ. रमेश बोहरे, देवेंद्र मुनेश्वर, प्रकाश राऊत, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, चैतराम चुटे, मोहन दोनोडे, रमेश बहेकार, मनोज डोये व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: Combine each component in the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.