कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:50+5:302021-07-10T04:20:50+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचे कार्य युद्धपातळीवर ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जसजसे शासनाकडून लसीचे डोस प्राप्त होतील, त्यानुसार लसीकरण मोहीम नियमित राबविणे सुरू राहील, असे लसीकरण मोहीम प्रभारी हाडगे यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या महामारीपासून बचाव करायचा असेल, तर कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसीकरणाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती बराच काळ टिकून राहण्यास मदत होऊन कोरोना महामारीचा फैलाव किंवा परिणाम नियंत्रणात आणता येईल. वेगाने होणारा कोरोना संसर्ग आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तसेच गंभीर आर्थिक परिणाम विचारात घेता १८ वर्षांवरील सर्वांनी लस घेऊन लसीकरण मोहिमेस यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पिंकू मंडल यांनी केले आहे.