अफवांवर विश्वासन न ठेवता लसीकरणासाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:05+5:302021-05-10T04:29:05+5:30
गोंदिया : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी ...
गोंदिया : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले याला प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्या अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे यावे, असे आ. विनोद अग्रवाल यांनी कळविले आहे.
शासनाने कोरोना विरुध्दच्या लढण्यासाठी कंबर कसली आहे. संपूर्ण देशात जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे याच मोहीम अंतर्गत आमदार विनोद अग्रवाल यांनी कोरोना लसीकरण केले. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरणाची मोहिम आधी सुरू होती. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाशी युद्ध करणारे कोरोना वॉरियर्स यांना प्राधान्याने लसीकरण करण्याची शासनाने नियोजन केले आहे. यात प्राधान्याने आरोग्य विभागातील तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. यासोबतच पत्रकारांनीही लसीकरणाचे लाभ घेत स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करावे असे आ. विनोद अग्रवाल यांनी कळविले आहे.