समाजहितासाठी मतभेद विसरून एकत्र या!
By admin | Published: February 22, 2017 12:27 AM2017-02-22T00:27:32+5:302017-02-22T00:27:32+5:30
नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अनेक शासकीय सवलतीप्ाांसून वंचित आहे.
सुरेश चन्ने : नाभिक समाज स्रेहमीलन सोहळा
नवेगावबांध : नाभिक समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून अनेक शासकीय सवलतीप्ाांसून वंचित आहे. तरीपण स्वत:चा आणि समाजाचा फायदा न होण्यासाठी अनेक बंधू एकत्र येण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र संकट आल्यावर समाज आणि समाज संघटना बरोबर आठवते. यासाठी आधीपासूनच आपसातील मतभेद विसरून सर्वांच्या फायद्यासाठी जातीसाठी माती खाऊन एकत्र आल्याशिवाय समाजाचे उज्वल भविष्य नाही, असे विचार जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी मांडले.
ते नवेगावबांध येथे नाभिक समाज स्नेहमिलन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नरुले गुरूजी होते. अतिथी म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष घनश्याम मेश्राम, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, सालेकसा मार्गदर्शक तिलकचंद मौदेकर, मोरगाव अर्जुनी तालुकाध्यक्ष माणिक मेश्राम, पतीराम कावळे, उपाध्यक्ष दादा कावळे, सुरेश दाणे, मंडळ अध्यक्ष नारायण मेंढलकर व हरी दाणे उपस्थित होते.चन्ने पुढे म्हणाले, आपल्या समाजातील अनेक लोक स्वत:च्या मुलेमुली मोठे झाले की लग्नाच्या वेळेसच स्वार्थ साधण्यासाठी समाज व संघटनेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलामुलींच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने ते योग्य नाही, असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी किशोर दाणे, प्रेम सोनवाने, नेमराज सूर्यवंशी, युवराज उरकुडे, श्रीकांत सूर्यवंशी, अरुण मेश्राम, संदीप फुलबांधे, प्रशांत कावळे, सुनिल उरकुडे, चंद्रकुमार उरकुडे, जगदीश उरकुडे आणि हेमंत सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)